शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

टरबुजाच्या शेतीला बसला लॉकडाऊनचा फटका; लागवडीचा खर्चही निघाला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 12:06 IST

Murtijapur News : लॉकडाऊनमुळे  तालुक्यात टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना विदारक परिस्थीतीला सामोरे जावे लागले.

-संजय उमक मूर्तिजापूर : गत वर्षापासुन सर्वत्र कोरोना महामारीचा कहर सुरू आहे. कोरोना महामारीच्या या जैवीक युद्धात कीती तरी लोकांना आपलं जीवन संपवावं लागलय. या पार्श्वभुमीवर कोरोना संसर्गाला थांबवता यावं या हेतुने  लॉकडाऊनचा प्रयोग केला जातोय. याचा कृषी क्षेत्रावर  दुरगामी परीणाम झाल्याचं   सत्य असुन तालुक्यात इतर शेती व्यवसाया सोबतच टरबूज या हंगामी शेतीला प्रचंड आर्थिक फटका बसला आहे.        तालुक्यात लॉकडाऊनमुळे  टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना विदारक परिस्थीतीला सामोरे जावे लागले. तालुक्यातील धोत्रा शिंदे या गावातील शेतकरी दरवर्षी शेतात विविध प्रयोग करून काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतात. इथल्या काही शेतकर्‍यांनी वेगवेळ्या तब्बल ८ एकर क्षेत्रावर यावर्षी टरबूज लागवडीचा यशस्वी प्रयोग केलाय. पिकांची संगोपणा करत ९ लाख रुपये खर्चही केला. मात्र ऐनवेळी लागलेल्या लॉकडाउनमुळे उत्पादीत झालेल्या मालाला योग्य भाव व बाजारपेठ मिळाली नसल्याने लागवडीसाठी लागलेला लाखो रुपयाचा  खर्च व्यर्थ गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी टरबूज शेतीतून बऱ्यापैकी आर्थिक फायदा होतो. परंतु यावर्षी विक्री न झाल्याने संपूर्ण शेतीलील टरबूजाचे पिकच वाया गेले आहे. परिणामी शेतीला लागलेला खर्च सुद्धा निघाला नसल्यामुळे खरीपाची पेरणीपूर्व मशागत व पेरणी कशी करावी हा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. झालेल्या नुकसानी बाबत शासनाकडून मतदीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.  मी थेट टरबूज व खरबूज रोपे मागवून त्याची ४ एकर शेतीत लागवड केली त्यासाठी अडीच लाख रुपये खर्च झाला, परंतु लॉकडाऊन मुळे बाजारात टरबूज व खरबूज या फळांना मागणी नसल्याने प्रचंड आर्थिक फटका बसला आहे.-शिरीष देशमुखटरबूज उत्पादक शेतकरी, सिरसो लॉकडाऊन असल्याने व्यापारी माल घ्यायला तयार नाही, टरबूज शेतीतून उत्पादन झाले असले तरी तो लॉकडाऊनमुळे कुठेच विकता आला नाही, यामुळे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे, शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे.-शेख समीरटरबूज उत्पादक शेतकरी, धोत्रा शिंदे मार्च मध्ये दोन एकर मध्ये टरबूज लागलड केली होती त्यासाठी दीड लाख रुपये खर्च झाला. लॉकडाऊनमुळे व्यापारी माल घेत नसल्याने व बाजारपेठ बंद असल्याने संपूर्ण माल वाया गेला. 

-शराफत अली टरबूज उत्पादक शेतकरी, धोत्रा शिंदे

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरFarmerशेतकरीagricultureशेती