शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रब्बी हंगामासाठी १ डिसेंबरपासून सोडणार वान धरणाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 12:31 IST

पाणी १ डिसेंबरपासून मिळणार असल्याचे समजल्याने शेतकरी रब्बी हंगामात पिके घेण्याच्या तयारीला लागणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : वान हनुमान सागर प्रकल्पातून तेल्हारा तालुक्यासह संग्रामपूर तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांना १ डिसेंबरपासून पाणी मिळणार आहे. तेल्हारा येथे वान अधिकारी व शेतकरी यांच्या सभेत अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.यावर्षी तेल्हारा तालुक्यात पाऊस जास्त झाल्याने वान हनुमान सागर धरण काही दिवसांतच शंभर टक्के भरले आहे. सततच्या पावसाने बरेच वेळा विसर्ग करावा लागला आहे. त्यामुळे वान हनुमान प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी मिळेल ही आशा होती. तरी अमृत योजनेमुळे पाणी मिळते की नाही, ही शंका असताना आजच्या सभेत पाणी १ डिसेंबरपासून मिळणार असल्याचे समजल्याने शेतकरी रब्बी हंगामात पिके घेण्याच्या तयारीला लागणार आहेत. यावर्षी तालुक्यातील शेतकºयांच्या हाती खरिपाचे पीक लागले नाही. सततचा पाऊस अतिवृष्टीमुळे पीक उत्पादन नगण्य झाले. तसेच परतीच्या पावसामुळे होते नव्हती पिके हातची गेली. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. आता पर्याय नसल्याने शेतकरी रब्बी तयारीत होते.वान धरणाचे पाणी मिळाले तर पुढे काहीतरी पीक पेरता येईल, ही आशा शेतकºयांना होती. तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्प अधिकारी कार्यालय तेल्हारा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत लाभधारक शेतकºयांनी मोठी हजेरी लावली. यामध्ये वान धरणाचे पाणी मिळावे, अशी मागणी केल्यानंतर अधिकाºयांनी याला संमती देऊन येत्या १ डिसेंबरपासून रब्बी हंगामातील गहू, भुईमूग, हरभरा आदी पिकांना पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकºयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकºयांना शासनाने हरभरा, गहू बियाणे व खत मोफत देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.  दुष्काळी परिस्थिती पाहता सर्व पाणी वापर संस्थांच्यावतीने मागील पाणी पट्टी शासनाने माफ करावी व पुढील नियोजन नवीन सोसायट्यांनी करण्यास सहकार्य करावे.-हरिदास वाघ, शेतकरी, हिंगणी.

टॅग्स :AkolaअकोलाWan Projectवान प्रकल्पIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पagricultureशेती