शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण, सर्वोपचारमधील निवासस्थानांचा पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 14:45 IST

अकोला: एक-दोन हजार रुपये नव्हे तर तब्बल १० लक्ष ५४ हजार रुपये एवढ्या मोठ्या रकमेची पाणीपट्टी जमा करण्यास चालढकल करणाऱ्या महावितरण, महापारेषणसह सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाला गुरुवारी महापालिका प्रशासनाने जोरदार झटका दिला.

अकोला: एक-दोन हजार रुपये नव्हे तर तब्बल १० लक्ष ५४ हजार रुपये एवढ्या मोठ्या रकमेची पाणीपट्टी जमा करण्यास चालढकल करणाऱ्या महावितरण, महापारेषणसह सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाला गुरुवारी महापालिका प्रशासनाने जोरदार झटका दिला. संबंधित अधिकारी, कर्मचाºयांच्या शासकीय निवासस्थानांची नळ जोडणी खंडित करून पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई प्रशासनाने केली.शहरात महावितरण कंपनीसह महापारेषण व सर्वोपचार रुग्णालयातील शासकीय अधिकारी-कर्मचाºयांच्या निवासस्थानांना महापालिकेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. प्रशासकीय यंत्रणा असतानासुद्धा संबंधितांकडून मनपाच्या पाणीपट्टीचा भरणा केला जात नसल्याचे केविलवाणे चित्र आहे. संबंधित यंत्रणांकडे तब्बल १० लक्ष ५४ हजार रुपये पाणीपट्टी थकीत असून, अद्यापपर्यंत पाणीपट्टीचा भरणा करण्यात आला नाही. यासोबतच नळ जोडणीला मीटर बसविण्याबाबत संबंधितांकडून कार्यवाही केली जात नसल्याचे मनपा जलप्रदाय विभागाच्या वारंवार निदर्शनास आले आहे. यासंदर्भात संबंधित तीनही यंत्रणांना सातत्याने सूचना दिल्यानंतरही उपाययोजना होत नसल्याचे पाहून अखेर गुरुवारी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी नळ जोडणी खंडित करून पाणीपुरवठा बंद करण्याचा आदेश जलप्रदाय विभागाला दिला. त्यानुसार महावितरण, महापारेषण तसेच सर्वोपचार रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाºयांच्या शासकीय निवासस्थानांचा पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई करण्यात आली.१२४ निवासस्थानांचा पाणीपुरवठा बंदजलप्रदाय विभागाच्या धडक कारवाईमुळे महावितरण, महापारेषण तसेच सर्वोपचार रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाºयांच्या एकूण १२४ निवासस्थानांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. अवघ्या पाच ते दहा हजार रुपये थकीत मालमत्ता करापोटी मनपाकडून सर्वसामान्यांच्या घरांना सील लावल्या जाते. अशा स्थितीत लाखो रुपये पाणीपट्टी थकविणाºया यंत्रणांवर मनपाने केलेल्या कारवाईचे अकोलेकरांनी स्वागत केले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाmahavitaranमहावितरण