शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडच्या धरणातील जलसाठा पोहोचला ४६ टक्क्यांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 14:10 IST

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांतील धरणातील साठा आजमितीस ४६.८९ टक्केपर्यंत पोहोचला; पण बुलडाणा जिल्ह्यातील दोन धरणे कोरडी असून, इतरही धरणात अल्प जलसाठा असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे

ठळक मुद्देअकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ४९.७२ टक्के जलसाठा संकलित झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये १००, अरुणावती ७८.८१, तर बेंबळा धरणात ५२.७२ टक्केच जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील दोन धरणांमधील जलसाठा शून्य टक्केच आहे.

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांतील धरणातील साठा आजमितीस ४६.८९ टक्केपर्यंत पोहोचला; पण बुलडाणा जिल्ह्यातील दोन धरणे कोरडी असून, इतरही धरणात अल्प जलसाठा असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अकोला जिल्ह्याची जीवनरेखा काटेपूर्णा धरणाचा जलसाठा ५० टक्क्यांवर पोहोचल्याने यावर्षीचे पाणी संकट टळले आहे.वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणात ४६.८९ जलसाठा सध्या उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील दोन धरणांमधील जलसाठा शून्य टक्केच आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ४९.७२ टक्के जलसाठा संकलित झाला आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ६२.९८ टक्के जलसाठा संकलित झाला असून, उमा ६८.९२, मोर्णा धरणात ३१.९६ टक्के, तर वान धरणात आतापर्यंत ६५.५३ टक्के जलसाठा संकलित झाला. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणात अद्याप एक थेंबही वाढ झाली नसल्याने या धरणाची पातळी शून्य टक्के आहे. याच जिल्ह्यातील कोराडी मध्यम धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. तोरणा ११.११, तर उतावळी धरणातील पातळी २९.३१ टक्के झाली आहे. याच जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १४.२२ टक्के, पेनटाकळी धरणात ७.१० टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १६.६५ टक्के, पलढगमध्ये १७.७१ टक्के, मन धरणात १८.११ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ७६.९१ टक्के, एकबुर्जी धरणात १०० टक्के, तर सोनल धरणात ६६.४९ टक्के जलसाठा आहे.अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा धरणात ४६.२४ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये १००, अरुणावती ७८.८१, तर बेंबळा धरणात ५२.७२ टक्केच जलसाठा आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाVidarbhaविदर्भKatepurna Damकाटेपूर्णा धरणkhadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागर