शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

अकोला जिल्यात १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा जलसाठा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 2:33 PM

आगामी १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा जलसाठा अकोला जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये आहे, अशी माहिती जिल्हा पालक सचिव सौरभ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अकोला : अकोला जिल्यात पाणी टंचाईचा सामना करण्यास जिल्हा प्रशासन सज्ज असून प्रशासनाने उपाययोजनांची अमंलबजावणी सुरू केली आहे. आगामी १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा जलसाठा अकोला जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये आहे, अशी माहिती जिल्हा पालक सचिव सौरभ यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आयुष प्रसाद प्रामुख्याने उपस्थित होते.जिल्हयातील पाणी टंचाई व दुष्काळ सदृश्य परिस्थीतीच्या अनुषंगाने पालकसचिव सौरभ विजय यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनामध्ये पिण्याचे पाण्याचा टंचाईच्या निवारणासाठी केलेल्या उपययोजनांच्या संदर्भा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी सद्यस्थितीत काटेपूर्णा -११.३६ द.ल.घ.मी. वान- २७.९१ द.ल.घ.मी. उपयुक्त जलसाठा आहे. मध्यम प्रकल्पामध्ये मोर्णा-४.५३ द.ल.घ.मी., उमा- ०,४४ द.ल.घ.मी. जलसाठा आहे. उपलब्ध साठ्याचे नियोजन पाहता, १५ जुलै १९ पर्यंत पुरेल एवढे पिण्याचे पाणी आरक्षित असल्याची माहिती येथे देण्यात आली. अकोला जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ आॅक्टोबर ते जून २०१९ चा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात ४४६ गावांकरिता एकूण ५६९ विविध उपाययोजना प्रस्तावित आहेत. सदर उपाययोजनांची एकूण किंमत १२००.०२ लाख आहे. प्रस्तावित उपाययोजनांपैकी १७ मे २०१९ अखेर ३२३ गावांसाठी उपाययोजना करण्यात आल्या. यापैकी २४२ उपाययोजनांची कामे पूर्ण झाली असून, ११८ कामे प्रस्तावित आहेत. पाणीटंचाई स्थितीच्या अनुषंगाने ९७ गावांमध्ये २१२ विहिरी आणि बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. अधिग्रहित विहिरी आणि बोअरवेलच्या जलस्तराची नियमित तपासणीही सुरू आहे. जिल्ह्यात १० गावांमध्ये १२ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. यातील नऊ खासगी, तीन शासकीय असे एकूण १२ टँकर असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली. आवश्यक तेनुसार टँकरची संख्या वाढविण्यात येईल. सोबतच अधिग्रहणदेखील केल्या जाईल, असेही ते म्हणाले.  पाणी पुरवठा व स्वच्छता विभागानुसार खांबोरा ६४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना दुरुस्तीसाठी ७४.३१ लाख निधीस मान्यता प्राप्त झाली आहे. ते काम प्रगतिपथावर असल्याचेही त्यांनी सांगितले. चाराटंचाईच्या अनुषंगाने जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्या अहवालानुसार ३१४८९७ मोठे व लहान जनावरे आहेत. त्यानुसार २०१८-१९ च्या खरीप-रब्बी हंगाम मिळून ४७४४६९.३ मे. टन चारा, ३० जुलैपर्यंत पुरेल एवढा आहे, अशी माहितीही येथे देण्यात आली. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई स्थिती निवारणार्थ वॉररूमची स्थापना करण्यात आली असून, १०७७ हा टोल फ्री क्रमांक मदतीसाठी ठेवण्यात आला आहे.पत्रकारांच्या प्रश्नांमुळे प्रशासनाची कोंडीटंचाईच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी उपस्थित केलेल्या काही प्रश्नांमुळे प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली. आम्ही माहिती घेऊन सांगतो. कारवाई केल्या जाईल. त्याकडेही लक्ष दिल्या जाईल, असे उत्तर जिल्हाधिकारी पापळकर आणि मुख्य कार्यपालन अधिकारी प्रसाद यांनी दिले. महाजलच्या ८० योजनांची चौकशी थंड बस्त्यातजिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणार्थ उभारण्यात आलेल्या ८० महाजल योजनांचे काय झाले, त्यासाठी चार चौकशी समिती गठित झाल्या होत्या. त्याचे पुढे काय झाले, यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी चौकशी करून सांगतो, म्हणून वेळ काढून नेली. १३० ‘आरओ प्लांट’च्या पाणी उपशावर नाही प्रतिबंधजिल्ह्यात पाणीटंचाई असताना १३० आरओ प्लांटद्वारे साडेसोळा लाख लीटर पाण्याचा उपसा जमिनीतून दररोज होत आहे. यातील १० लाख लीटर पाण्याची दररोज नासाडी होत आहे. काही लोक पाण्याचा व्यवसाय करीत आहेत. त्यावर काही प्रतिबंध लावले का, यावरदेखील जिल्हाधिकारी यांनी कारवाई होईल म्हणून मोघम उत्तर दिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय