शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरमाथ्यावर आढळला जलस्रोत

By admin | Updated: May 3, 2016 02:09 IST

दुष्काळात ग्रामस्थांना दिलासा; जलयुक्त शिवार अंतर्गत काम सुरू असताना लागले पाणी.

साहेबराव गवई / विझोरा (जि. अकोला)भूजल पातळीत दिवसेंदिवस घट होत असतानच डोंगरमाथ्यावर जलस्रोत आढळून आला आहे. बाश्रीटाकळी तालुक्यातील अजनी बु. येथे केवळ तीन फूट पाणी लागल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. दुष्काळात तीन फुटावर झरा लागल्याने अनेक जण आश्‍चर्यचकीत झाले आहेत. सध्या संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बाश्रीटाकळी तालुक्यातीत ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणच्या कूपनलिका व विहिरी आटल्या आहेत. बाराही महिने पाणी असणार्‍या विहिरीही आटल्या आहेत. अनेक गावांमध्ये पिण्यासाठी पाणी मिळणेसुद्धा दुरापास्त झाले आहे. ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट होत असतानाच अजनी येथे जलस्रोत आळल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे. पाणी पिण्यास योग्यअजनी बु. गावाशेजारील टेकड्यांच्या पायथ्याशी पाण्याचे झरे आढळून आले आहेत. हे पाणी पिण्यायोग्य असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अजनी बु. परिसरातील गावांत भीषण पाणीटंचाई आहे. गाव परिसरातील विहिरी व कूपनलिका आटल्या आहेत. त्यामुळे या नवीन जलस्रोतून पर्यायी व्यवस्था म्हणून ग्रामस्थांना पाणी पुरवठा करावा, अशी मागणी आता होत आहे. असे आढळून आले पाण्याचे स्रोतअजनी बु. येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामे सुरु आहेत. यंत्राद्वारे काम सुरू असताना तीन फुटावर जमिनीत ओलावा असल्याचे समोर आले. त्यानंतर खाली खोदले असता, पाण्याचा स्रोत आढळून आला. सरपंच वर्षा चव्हाण यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांच्या सुचनेवरून येथे शेततळ्यासारखी खोदकामे करण्यात आली आहेत. सध्या तेथे पाणी साठले आहे.