शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

पाणीटंचाई निवारणाच्या देयकांपोटी हवे ५.५४ कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 11:03 IST

देयके अदा करण्यासाठी ५ कोटी ५४ लाख ७८ हजार रुपये निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे.

- संतोष येलकरअकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी गत जुलै अखेरपर्यंत पूर्ण करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या कामांची देयके अदा करण्यासाठी ५ कोटी ५४ लाख ७८ हजार रुपये निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून ७ आॅगस्ट रोजी अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविला.जिल्ह्यातील ग्रामीण भागात गत उन्हाळ्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानुषंगाने जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टंचाई अंतर्गत गत जुलै अखेरपर्यंत पाणीटंचाई निवारणाच्या विविध उपाययोजनांची कामे करण्यात आली. त्यामध्ये नवीन विंधन विहीर, कूपनलिका, तात्पुरती पूरक नळ योजना, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, खासगी विहिरींचे अधिग्रहण व टँकरद्वारे पाणी पुरवठा इत्यादी उपाययोजनांच्या कामांचा समावेश आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांच्या कामांचा खर्च भागविण्यासाठी गत मे अखेरपर्यंत शासनामार्फत ८ कोटी ८१ लाख ७४ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. उपलब्ध निधी पाणीटंचाई निवारण कामांवर खर्च करण्यात आला असून, जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी पूर्ण करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या कामांची देयके अदा करण्यासाठी ५ कोटी ५४ लाख ७८ हजार रुपये निधीची मागणी संबंधित यंत्रणांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे. त्यानुषंगाने पाणीटंचाई निवारणाच्या कामांची देयके अदा करण्यासाठी ५ कोटी ५४ लाख ७८ हजार रुपये निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.उपाययोजनानिहाय अशी आहे निधीची मागणी!उपाययोजना                                          निधी (लाखात)नळ योजना विशेष दुरुस्ती                         १७९.४८टँकरद्वारे पाणी पुरवठा                             २००.००नवीन विंधन विहिरी, कूपनलिका                ७८.५४तात्पुरती पूरक नळ योजना                        ०९.९४खासगी विहिरींचे अधिग्रहण                       ८६.८२..........................................................................एकूण                                                        ५५४.७८विद्युत देयकांसाठी दोन कोटींची मागणी!जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा योजनांच्या जून महिन्यातील विद्युत देयकांची रक्कम अदा करण्यासाठी दोन कोटी रुपयांच्या निधीची मागणी संबंधित यंत्रणांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे. त्यानुषंगाने विद्युत देयकांची रक्कम अदा करण्यासाठी दोन कोटी रुपये निधीची मागणीही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाईAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय