शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

खारपाणपट्ट्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; तहान भागविण्यासाठी ‘टँकर-झिऱ्या’वर धाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 13:31 IST

अकोला : जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात ‘बारुला ’ विभागातील गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला असून, तहान भागविण्यासाठी ग्रामस्थांना टँकर आणि झिºयावर धाव घ्यावी लागत आहे.

ठळक मुद्देखारपाणपट्ट्यातील ‘बारुला’ विभागातील गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. टँकर आल्यानंतर पाण्यासाठी टँकरवर ग्रामस्थांची झुंबड होत आहे.

- संतोष येलकर

अकोला : जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात ‘बारुला ’ विभागातील गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला असून, तहान भागविण्यासाठी ग्रामस्थांना टँकर आणि झिºयावर धाव घ्यावी लागत आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने, अकोला व खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणी पुरवठा करणाºया महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. उपलब्ध जलसाठा अकोला शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी आरक्षित करण्यात आला असून, धरणातून खांबोरा पाणी पुरवठा योजनेंतर्गत खारपाणपट्ट्यातील गावांना गत आॅक्टोबरपासून पाणी पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे खारपाणपट्ट्यातील ‘बारुला’ विभागातील गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यानुषंगाने या गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे; मात्र कुठे चार, कुठे सहा तर कुठे पंधरा दिवसांआड टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टँकरद्वारे पाण्यावर तहान भागविण्यासाठी गावागावात टँकर आल्यानंतर पाण्यासाठी टँकरवर ग्रामस्थांची झुंबड होत आहे. टँकरद्वारे अनियमित आणि अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने, तहान भागविण्यासाठी बारुला विभागातील म्हातोडी, आपोती बु. येथील एका शेतातील झिºयाच्या पाण्यावर ग्रामस्थांना धाव घ्यावी लागत आहे.‘बारुल्या’तील पाणीटंचाईग्रस्त अशी आहेत गावे!खारपाणपट्ट्यातील ‘बारुला ’ विभागातील १२ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये घुसर, घुसरवाडी, म्हातोडी, लाखोंडा बु., लाखोंडा खुर्द, मारोडी, खोबरखेड, आपोती बु., आपोती खुर्द, अनकवाडी, आखतवाडा-शामाबाद, सुलतान अजमपूर इत्यादी गावांचा समावेश आहे.जनावरांची तहान भागविण्याचीही चिंता!पाणीटंचाईग्रस्त बारुला विभागातील गावांमध्ये जिथे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे, तिथे जनावरांना पिण्याचे पाणी कोठून आणणार, याबाबतची चिंता शेतकºयांना सतावत आहे. ‘बारुल्या’तील म्हातोडी गावातील जनावरांची तहान गावानजीक असलेल्या लोणार नाल्यातील झिºयातील गढूळ पाण्यावर भागविली जात असल्याचे चित्र आहे.

पाणी विकत घेऊन भागविली जाते तहान !टँकरद्वारे मिळणारे पाणी पुरेसे नाही, खारपाणपट्टा असल्याने पिण्यायोग्य पाण्याचा दुसरा स्रोत उपलब्ध नाही, अशा परिस्थितीत पाणीटंचाईग्रस्त बारुला विभागातील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.टँकरद्वारे पंधरा दिवसांआड पाणी मिळते, ते पुरेसे नाही. त्यामुळे लोणार नाल्यातील झिºयाच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. झिºयाजवळ साचलेल्या गढूळ पाण्याचा वापर कपडे धुण्यासाठी व जनावरांची तहान भागविण्यासाठी करावा लागत आहे.-छाया प्रकाश इंगळे, कमला इद्रभान इंगळे, म्हातोडी.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी