शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर तालुक्यावर पाणी टंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 17:40 IST

Water scarcity in Murtijapur taluka : १७ विहिरी अधिग्रहित, १३ विरहितील गाळ काढणे, ६ नळ योजना दुरुस्ती, ४० विंधन विहिरी व ११ कुपनलीका पाणी टंचाई उपाय योजना आराखडय़ात मंजूर करण्यात आल्या आहेत.

- संजय उमकमूर्तिजापूर : भूगर्भातील पाणी पातळी खोल गेल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणी समस्या निर्माण झाली आहे. त्यासाठी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन तालुका स्तरावर एक शासकीय कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. पारा चढत आहे उन्हाची काहिली वाढत आहे. पिण्यासाठी होणारी जीवाची कासावीस तालुक्यात वाढली आहे. अशा भिषण परीस्थीतीत पाणी टंचाईचा कृती आराखडा कागदावर असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. प्रस्तावित ७ सात गावात भिषण पाणी टंचाई असल्याचे कृती आराखड्यात नमुद आहे; परंतू त्या गावांसाठी कुठलीही उपाय योजना करण्यात आली नसल्याने कृती आराखडा कागदावरच राहिला आहे.              तालुक्यातील पाणी टंचाई लक्षात घेता संभाव्य उपाय योजना म्हणून ७५ गावांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तालुक्यातील किनी, चिखली, सोनोरी (मूर्तिजापूर), जामठी (माटोळा ), कवठा (खोलापुर), बोरगाव (निंघोट), साखरी, निंभा या गावात पाणी टंचाईचे सावट आहे. या गावासाठी विहीरी अधिग्रहित करणे, नळ दुरुस्ती करणे आदी उपाय योजना प्रस्तावित आहे, कृती आराखड्या नुसार ७५ गावातील १० गावाच्या उपाय योजनेसाठी पाणी टंचाई उपाय योजना, १७ विहिरी अधिग्रहित, १३ विरहितील गाळ काढणे, ६ नळ योजना दुरुस्ती, ४० विंधन विहिरी व ११ कुपनलीका पाणी टंचाई उपाय योजना आराखडय़ात मंजूर करण्यात आल्या आहेत.       संपुर्ण मागील वर्षी पावसाळ्यात ७११.२० मिलिमीटर येवढी पावसाची नोंद करण्यात आली आहे पाऊस गतवर्षीच्या तुलनेत अधिक प्रमाणात असला तरी विहीरी, विंधन विहिरींतील पाण्याची पातळी तळाला भिडली आहे. नद्या, बॅरेजेस मध्ये ठणठणाट असल्याने संपूर्ण तालुक्यात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.           संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता तालुका शासकीय स्तरावर पुरक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तालुक्यात उमा प्रकल्पावर कार्यान्वित असलेली एकमेव लंघापुर ५७ खेडी पाणी पुरवठा योजना असुन उमा प्रकल्प तुडुंब भरत असल्याने ही योजना तालुक्यासाठी जल संजीवनी ठरणार असली तरी ग्राहकांनी देयके नभरल्याने जीवन प्राधिकरण विभागाने ३७ गावचा पाणीपुरवठा खंडित केल्याने या गावांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. तर यावर्षी पासून यातील हातगाव, सोनोरी (मूर्तिजापूर ) व हेंडज तंत्रनिकेतन महाविद्यालय यांना करार तत्वावर पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जीवन प्राधिकरण कडून प्राप्त झाली आहे.               या कृती आराखड्यात विशेषतः निम्म्याहून अधिक नदी काठचेच  गावे असुन त्यामध्ये मुंगशी, शेलू नजीक, वाघजाळी, ताकवाडा, दापुरा, शिरताळा, बपोरी, सोनोरी, शेलू बाजार, सांगवी, रोहणा, बोर्टा, लंघापुर, यावरुन तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई चित्र स्पष्ट होते. कृती आराखड्यानुसार नळयोजना दुरुस्ती, टँकरने पाणीपुरवठा करणे, विहिरी अधिग्रहित करणे, विहिरीतील गाळ काढणे, विंधन विहिरी व कुपनलीका पाणी टंचाई उपाय योजनेसाठी १ लक्ष ५८ हाजार एवढा खर्च अपेक्षित आहे. 

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरwater scarcityपाणी टंचाई