शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
3
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
4
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
5
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
6
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
7
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
8
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
9
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
10
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
11
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
12
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
13
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
14
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
15
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
16
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
17
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
18
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
19
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
20
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!

विदर्भातील फळबागांवर पाणी टंचाईचे सावट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 6:28 PM

अकोला : विदर्भातील फळबागांवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले असून, अनेक भागात संत्रा,लिंबू व इतर फळपिकांच्या बागा वाळू लागल्या आहेत. झाडे वाचवायची असतील अशा परिस्थितीत फळांचा बहारच घेऊ नये असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना दिला.

अकोला : विदर्भातील फळबागांवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले असून, अनेक भागात संत्रा,लिंबू व इतर फळपिकांच्या बागा वाळू लागल्या आहेत. झाडे वाचवायची असतील अशा परिस्थितीत फळांचा बहारच घेऊ नये असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना दिला.विदर्भात १ लाख ३० हेक्टर संत्रा असून, लिंबाचे क्षेत्र २७ हजार हेक्टरपर्यंत आहे. संपूर्ण राज्यात संत्रा १ लाख ५० हजार हेक्टर,मोसंबी ९० हजार तर लिंबूचे क्षेत्र ५० हजार हेक्टर आहे.यासह इतर फळ झाडांवर यावर्षी पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले.२०१६-१७ व २०१८ मध्ये कमी पाऊस झाल्याने यावर्षी भूजल पातळी घटली. बहुतांश ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आटले आहेत.या परिस्थितीत फळ झाडांना पाणीच मिळत नसल्याने झाडे वाळण्याच्या स्थितीत आहेत.ही झाडे टिकवायची असतील तर शेतकऱ्यांनी कोणताच बहार घेऊ नये असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना दिला. झाडावर फळे जर असतील तर पाणी जास्त लागते. ज्या शेतकºयांकडे पाणी उपलब्ध असेल त्या शेतकºयांनी ठिबक सिंचन करावे, झाडांच्या बुंध्याजवळ गांडूळ खत टाकावे, पाला पाचोळाही टाकावा तसेच ३० मायक्रॉन चे मल्चींग करावे. म्हणजे झाडांचे संरक्षण करता येईल. तसेच पाणी देताना प्रथम एका दांडाने व दुसरी पाळी देताना दुसºयां दांडाने पाणी द्यावे त्यामुळे झाडांच्या दोन्ही बाजुने ओलावा राहील. झाड टिकवता येईल. एप्रिल - मे महिन्यात तापमान वाढणार असल्याने शेतकºयांनी फळझाडांची काळजी घेणे गरजेचे आहे.- जलस्त्रोत घटल्याने फळझाडांवर परिणाम होत आहे.म्हणून यावर्षी शेतकºयांनी संत्रा,लिंबू व इतर फळांचा बहार न घेता पाण्याचे व्यवस्थापन करावे. ठिबक सिंचन,मल्चींग,गांडूळ खत आदीसह कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार व्यवस्थापन करावे.डॉ. दिनेश पैठणकर,प्रमुख,लिंबूवर्गीय फळे संशोधन केंद्र,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती