शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडातील धरणात २८.१ टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 16:47 IST

अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात ३.६२ टक्के साठा आहे.

अकोला : पश्चिम (वऱ्हाड) विदर्भात बुधवारपासून बऱ्यापैकी पाऊस होत असल्याने ५०२ प्रकल्पांतील जलसाठ्यात २८.०१ टक्के वाढ झाली आहे. अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा २७ टक्क्यांवर पोहोचला असून, अकोला जिल्ह्यातील वान धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत.अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत ९ मोठे, २४ मध्यम व ४६९ लघू प्रकल्प आहेत. या ५०२ प्रकल्पांत गुरुवार सकाळी ८.३० वाजतापर्यंत २८.०१ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. मोठ्या ९ धरणांतील बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाचा साठा शून्य टक्केच तर अकोला शहराची तहान भागविणाºया काटेपूर्णा धरणात ३.६२ टक्केच जलसाठा आहे. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा धरणात २७.४२ टक्के जलसाठा उपलब्ध झाला. यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणात ३४.८१, अरुणावतीमध्ये ११.४०, अरुणावती धरणात ५७.३० टक्के जलसाठा संचयित झाला आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात ३.६२ टक्के साठा आहे. याच जिल्ह्यातील वान धरणात मुबलक जलसाठा संचयित झाल्याने या धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी धरणात ४१.२० टक्के, नळगंगा धरणात १४.६७ टक्के साठा आहे. २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ४५.१२ टक्के साठा उपलब्ध झाला. यामध्ये अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांतील चार मध्यम प्रकल्प शून्य टक्क्यावरच आहेत. ४६९ लघू प्रकल्पांत १७.१३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाDamधरण