लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : शहरासह तालुक्यात यावर्षी अल्प पाऊस झाल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या महान धरणाचा जलसाठा कमी झाल्याने तेथून पाणी मिळणे बंद झाल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने घुंगशी बॅरेजमधून पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नगराध्यक्ष मोनाली कमलाकर गावंडे यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. मूर्तिजापूर शहराचा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आमदार हरीश पिंपळे यांच्या मार्गदर्शनात नगराध्यक्ष मोनाली गावंडे धडपड करीत आहेत. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासमोर पाण्याची समस्या ठेवण्यात आली, तेव्हा ना. पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यासोबत दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. घुंगशी बॅरेजचा प्रस्ताव लवकर मंजूर करण्यात येणार आहे, असे अश्वासन दिले होते. घुंगशी बॅरेजच्या माध्यमातून काही प्रमाणात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर तोडगा निघू शकतो. सध्या उमई येथून पाण्याची उचल करण्यास जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंजुरी दिली आहे. जिल्हाधिकार्यांनी पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगराध्यक्ष मोनाली गावंडे यांनी त्यांचे आभार मानले. पालकमंत्र्यांना निवेदन देताना न.प. उपाध्यक्ष कविता राहुल गुल्हाने, पाणीपुरवठा सभापती स्नेहा गजानन नाकट, आरोग्य सभापती सचिन देशमुख, माजी नगराध्यक्ष द्वारका दुबे, नगरसेविका सरिता राहुल पाटील, धनश्री भेलोंडे, मंदा जळमकर, नगरसेवक लाला डाबेराव, सुनील पवार, कमलाकर गावंडे, संदीप जळमकर, राहुल पाटील, राहुल गुल्हाने उपस्थित होते.
मूर्तिजापूर शहराला घुंगशी बॅरेजमधून पाणी द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:52 IST
मूर्तिजापूर : शहरासह तालुक्यात यावर्षी अल्प पाऊस झाल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या महान धरणाचा जलसाठा कमी झाल्याने तेथून पाणी मिळणे बंद झाल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने घुंगशी बॅरेजमधून पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नगराध्यक्ष मोनाली कमलाकर गावंडे यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
मूर्तिजापूर शहराला घुंगशी बॅरेजमधून पाणी द्या!
ठळक मुद्देपालकमंत्र्यांना नगराध्यक्षांचे निवेदनअल्प पाऊस झाल्याने पाणीटंचाई