शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घुंगशी बॅरेजमधून सोडले पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:53 IST

पूर्णा नदीचे पात्र कोरडे पडल्याने गोपालखेड पाणी पुरवठा योजना गेल्या काही दिवसांपासून बंदच पडली होती. त्यामुळे या योजनेद्वारे पाणी पुरवठा होत असलेल्या धामणासह इतर गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती.

ठळक मुद्देगोपालखेड पाणी पुरवठा योजनेसाठी लाभदायक!

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव वैराळे : पूर्णा नदीचे पात्र कोरडे पडल्याने गोपालखेड पाणी पुरवठा योजना गेल्या काही दिवसांपासून बंदच पडली होती. त्यामुळे या योजनेद्वारे पाणी पुरवठा होत असलेल्या धामणासह इतर गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. या गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणी पुरवठा होत असला, तरी लोकसंख्येच्या तुलनेत तोकडा पडत होता. याविषयी लोकमतने वृत्त प्रकाशित करताच पाटबंधारे विभागाने घुंगशी बॅरेजमधून पाणी सोडले आहे. त्यामुळे, पूर्णा नदीचे पात्र वाहू लागले असून, नदीकाठावरील गावांसह इतर गावांना पाणीटंचाईतून दिलासा मिळाला आहे.   यावर्षी अल्प पाऊस झाल्याने जलप्रकल्पांनी तळ गाठला आहे. परिसरातील गावांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पूर्णा नदीचे पात्रही हिवाळ्य़ातच कोरडे पडल्याने पाणीटंचाईचे संकट वाढले होते; तसेच  गांधीग्राम, गोपालखेड, निराट, वैराट, राजापूर, धामणा, नवीन धामणा येथे पाणी पुरवठा करण्यात येणारी गोपालखेड योजनाही बंद पडली होती, त्यामुळे या गावांमध्ये टॅँकरने पाणी पुरवठा सुरू करावा लागला होता. पाटबंधारे विभागाने घुंगशी बॅरेजमधून पाणी सोडल्याने पूर्णा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. सध्या नदीच्या पात्रात पाच  ते सहा फूट पाणी असल्याने नदीकाठावरील गावांना दिलासा मिळाला आहे, तसेच पूर्णा नदीवरून बागायती शेती करणार्‍या शेतकर्‍यांच्या गहू, हरभरा, कपाशी ,तूर या पिकांसाठी लाभदायक ठरणार आहे. पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णा नदीत पाणी आल्याने मिटला आहे. पूर्णा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात आणि आमदार रणधीर सावरकर यांच्यासह सरपंच उज्‍जवला मोहन भांबेरे यांनी पाठपुरावा केला. 

गोपालखेड योजनेसह इतर गावातील पाणी प्रश्न बिकट झाला होता, तसेच पूर्णा नदीच्या पात्रात पाणी सोडण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनीसुद्धा केली होती. परिसरातील गावातील पाणी समस्या लक्षात घेता घुंगशी बॅरेजमधून पाणी सोडण्यात आले. - मनोज बोंडे,  कनिष्ठ अभियंता, पाटबंधारे विभाग, अकोला. 

टॅग्स :Waterपाणी