शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

Water cup compitation : नवरदेव-नवरीचे बांधावर श्रमदान  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 15:58 IST

नव्याने लग्न झालेल्या भुषण व रोषणी या नवदाम्पत्याने आपल्या लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी सकाळी   शिवार गाठून बांधावर जोड्याने श्रमदान केले. 

- सत्यशील सावरकर तेल्हारा :  सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेच्या चौथ्या पर्वात तालुक्यातील मनब्दा गावात पाणी फाऊंडेशनचे तुफान आले आहे. गावातील आबालवृद्ध महिला पुरुष श्रमदानात हिरीरीने भाग घेत आहेत.  नव्याने लग्न झालेल्या भुषण व रोषणी या नवदाम्पत्याने आपल्या लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी सकाळी   शिवार गाठून बांधावर जोड्याने श्रमदान केले. तालुक्यातील मनब्दा ग्रामस्थांनी  शेत शिवारात श्रमदान करून पाणी फाऊंडेशनच्या विविध उपाययोजना राबवून गतवर्षी सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला होता. त्या दरम्यान गावकऱ्यांनी लोकसहभाग व जनजागृती पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून शिवार जलमय व हिरवेगार केले. त्याकामात राहिलेली कसर काढण्यासाठी गाव पुन्हा या वर्षी जोमाने कामाला लागल्याचा प्रत्यय 9 एप्रिल ला लग्न झालेल्या भुषण व रोषणी या नवदाम्पत्याच्या लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी लग्न समारंभातील विधी बरोबरच श्रमदानाला महत्त्व देण्यावरून दिसून येते. येथील भुषण श्रीकृष्ण पाथ्रीकर याचा विवाह वाडेगाव येथील रोषणी हिचे सोबत दि. 9 एप्रिल ला सानंद संपन्न झाला लग्न समारंभ आटोपल्यावर नवरी घरी आल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी घरात नवचैतन्य व नवरी आल्याची धावपळ नान्होरा, वाटमोकळी, वान वाटप इत्यादी कार्यक्रम असतात; परंतु पाण्याचे भविष्यातील महत्त्व जाणून गत वर्षी एकट्याने श्रमदान केले. आता जोड्याने श्रमदान करायचा संकल्प केलेल्या भुषणने दुसर्‍या दिवशी सकाळी गाव शिवारात पाणी फाऊंडेशनच्या सुरू असलेल्या श्रमदानाला आपल्या सहचारिणी सोबत हजेरी लावून श्रमदान केले. नवरदेव नवरी बांधावर येवून श्रमदान करत असल्याचे पाहून इतर गावकरी जोमाने श्रमदानाला लागले. त्यामुळे गावात पाणी फाऊंडेशनचे तुफान आल्याचे दिसत आहे. यावेळी गावचे सरपंच, सदस्य, विविध सामाजिक संस्था, संघटना व पाणी फाऊंडेशनचे पदाधिकारी समन्वयक इत्यादी उपस्थित होते.

टॅग्स :AkolaअकोलाWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाTelharaतेल्हारा