शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

Water cup compitation : निवडणुकीच्या धामधुमीतही जलसैनिक श्रमदानात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 6:11 PM

अकोला: लोकसभा निवडणुकीची जिल्ह्यात धामधुम सुरू असताना २६२ गावातील जलसैनिक श्रमदान करीत आहेत.

ठळक मुद्देस्पर्धेला ८ एप्रिललाच धडाक्याने सुरुवात करण्यात आली आहे.लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वच श्रमदानात वाटा उचलत आहेत. जलसंधारणासाठी श्रमदानाची चळवळ उभी राहत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

- संदीप वानखडे

अकोला: लोकसभा निवडणुकीची जिल्ह्यात धामधुम सुरू असताना २६२ गावातील जलसैनिक श्रमदान करीत आहेत. अभिनेता अमिर खानच्या पाणी फाउंडेशन अंतर्गंत वाटर कप स्पर्धेत जिल्ह्यातील चार तालुक्यांनी सहभाग घेतला आहे. ८ एप्रिल पासून स्पर्धा सुरू झाल्यापासून ग्रामस्थ जलसंधारणासाठी श्रमदान करीत असल्याचे चित्र आहे.पावसाच्या पाण्याचे संचयन शास्त्रीय पद्धतीने व्हावे, या उदात्त हेतूने अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने अकोला जिल्ह्यात चार तालुक्यात वॉटर कप राबवण्यात येत आहे. कपमध्ये सहभागी होण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ रुजत आहे. प्रत्येक गावात पाणलोट व्यस्थापनाच्या वैज्ञानिक पद्धती वापरून पावसाचे पाणी साठवले पाहिजे, या हेतूने सत्यमेव जयते वॉटर कपचे आयोजन पाणी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले. हा कप म्हणजे स्पर्धेच्या काळात जलसंवर्धन आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करण्यासाठी वेगवेगळ््या गावांमध्ये लावलेली शर्यत होय. स्पर्धेला ८ एप्रिललाच धडाक्याने सुरुवात करण्यात आली आहे. यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान, ही स्पर्धा सुरू झाली आहे. जिल्हाभरात प्रचाराचा धुराळा उडत असताना अनेक जलसैनिक जलसंधारणासाठी श्रमदानात गुंतलेले आहेत. गावे पाणीदार करण्यासाठी लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वच श्रमदानात वाटा उचलत आहेत. अनेक गावांनी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी रात्री १२ वाजता श्रमदानास सुरूवात करून उत्साहाने सहभाग घेतला आहे.तेल्हारा तालुक्यातील सौंदळा येथे तृतीय पंथीयांच्या हस्ते पूजन करून श्रमदानास सुरूवात करण्यात आली. पहिल्या दिवसाचा हा उत्साह अनेक गावांमध्ये कायम आहे. लोकशाहीच्या उत्सवासोबतच जिल्ह्यात श्रमदानाचा उत्सवही सुरू असल्याचे चित्र आहे. पहिल्याच दिवशी जलदिंडी, गावातून प्रभात फेरी काढून तसेच विविध उपक्रम राबवून श्रमदानास सुरूवात झाली आहे. प्रशिक्षण घेउन आलेले जलमित्र ग्रामस्थांना शास्त्रशुद्ध पद्धतीने जलसंधारणाची कामे कशी करावी,याविषयी मार्गदर्शन करीत आहेत. सकाळी आणि सायंकाळी ग्रामस्थ श्रमदान करीत आहेत. जलसंधारणासाठी श्रमदानाची चळवळ उभी राहत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

टॅग्स :AkolaअकोलाWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा