शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
8
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
9
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
10
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
11
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
12
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
14
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
15
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
16
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
17
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
18
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
19
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
20
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या

वऱ्हाडावरील जलसंकट होणार गडद; प्रमुख धरणांमध्ये उरला फक्त ३९ टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 6:40 PM

अकोला : यावर्षी कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील (वºहाड) सर्व धरण मिळून केवळ ३९.७८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. एका महिन्यात या जलसाठ्यात दहा टक्के घट झाली. अकोलेकरांची लाइफ लाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर १६.४९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यात अर्धा गाळ असल्याने अकोलेकरांवरील जलसंकट गडद झाले आहे.

ठळक मुद्देअकोल्यातील चित्र भीषण; काटेपूर्णा धरणात १६ टक्के जलसाठा.पूस २२.५, अरुणावतीमध्ये केवळ १६ टक्के ,सोनल प्रकल्पात ३.२५ टक्केच जलसाठा.

- राजरत्न सिरसाटअकोला : यावर्षी कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील (वºहाड) सर्व धरण मिळून केवळ ३९.७८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. एका महिन्यात या जलसाठ्यात दहा टक्के घट झाली. अकोलेकरांची लाइफ लाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर १६.४९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यात अर्धा गाळ असल्याने अकोलेकरांवरील जलसंकट गडद झाले आहे.वºहाडात मोठे, मध्यम व लघू मिळून एकूण ४८४ प्रकल्प असून, या सर्व प्रकल्पात आजमितीस ३९.७८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागच्या नोव्हेंबर महिन्यात हा जलसाठा ४९.९७ टक्के होता. १५ डिसेंबर रोजी अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा या मोठ्या धरणात १६.४९ टक्केच जलसाठा शिल्लक होता. याच जिल्ह्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १५.८५ टक्के, निर्गुणा ५९.९७, उमा धरणात केवळ ४.६२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. दगडपारवा धरण शून्य टक्के आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वान धरणात सध्या ९६.६२ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात ३८.३९ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणाची पातळी १२.८८ टक्के आहे. पेनटाक ळी धरणात ३२.९५ टक्के जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये ५२.२५, मसमध्ये १७.९५ टक्के, कोराडी १९.९७, पलढग ९७.६०, मन १७.२. तोरणा २२७.५० टक्के, तर उतावळी धरणात ३६.३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात २४.०० टक्के, सोनल मध्यम प्रकल्पात ३.२५ टक्के, तर एकबुर्जी धरणात २७.८२ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणात २०.७४ टक्के, अरुणावतीमध्ये १४.६९, तर बेंबळा धरणात १८.२२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा या मोठ्या धरणात ९९.६७ टक्के एवढा बºयापैकी जलसाठा शिल्लक आहे.वऱ्हाडात नऊ मोठे प्रकल्पवऱ्हाडातील नऊ मोठ्या धरणात ४५.५६ टक्के जलसाठा आहे. २३ मध्यम प्रकल्पात ४३.१० टक्के, तर ४५२ लघू प्रकल्पात २९.१० टक्के जलसाठा शिल्लक आहे. या सर्व जलसाठ्यातील पाण्याची सरासरी टक्केवारी ही ३९.७८ टक्के आहे. यातील लघू प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही. त्यामुळे मोठे व मध्यम प्रकल्पातील पाणीच वापरले जाणार आहे. यातील बहुतांश धरणात अर्धा गाळ आहे.

टॅग्स :Katepurna Damकाटेपूर्णा धरणAkola Ruralअकोला ग्रामीण