शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

२८ एकरांवरील खोदतळ्यांमध्ये पाणी साठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 13:13 IST

२८ एकरांवर करण्यात आलेल्या खोदतळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा उपलब्ध झाला.

ठळक मुद्देअकोट तालुक्यात २८ एकर क्षेत्रावर खोदतळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली. पाच किलोमीटर खार नाला सरळीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. या कामांच्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पाणी साठा उपलब्ध झाला आहे.

अकोला : लोहमार्ग विस्तारीकरणाच्या कामाला जलसंधारण कामांची सांगड घालून जिल्ह्यातील अकोट तालुक्यात जलसंधारणाची नऊ कामे पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये २८ एकरांवर करण्यात आलेल्या खोदतळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा उपलब्ध झाला.जिल्ह्यातील अकोट तालुक्यात लोहमार्ग विस्तारीकरणाच्या कामासाठी गौण खनिज उपलब्ध करून देण्याची मागणी रेल्वे विभागामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यानुसार लोहमार्ग विस्तारीकरणाच्या कामाला जलसंधारणाच्या कामाची सांगड घालून जिल्हाधिकाºयांमार्फत गौण खनिज वापरासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यामधून अकोट तालुक्यात २८ एकर क्षेत्रावर खोदतळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली. तसेच पाच किलोमीटर खार नाला सरळीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. जलसंधारणाच्या या कामांच्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पाणी साठा उपलब्ध झाला आहे.गावनिहाय अशी करण्यात आली जलसंधारणाची कामे !लोहमार्ग विस्तारीकरणाच्या कामात खोदतळे व नाला सरळीकरण-रुंदीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये कालवाडी येथे ६ एकर, वणी वारुळा - २.५ एकर, बळेगाव - २.५ एकर, बळेगाव -२ एकर, तरोडा -४ एकर, करोडी -४ एकर, दनोरी-४ एकर व देवरी येथे ३ एकर क्षेत्रावर खोदतळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली. तसेच ५ किलोमीटर खार नाला सरळीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले.खर्चाची बचत अन् गौण खनिजाची मिळाली ‘रॉयल्टी’लोहमार्ग विस्तारीकरणाच्या कामात खोदतळे व नाला सरळीकरण-रुंदीकरणाची कामे करण्यात आली. त्यामुळे जलसंधारणाच्या कामांसाठी येणाºया खर्चाची बचत झाली असून, जलसंधारणाच्या कामांमुळे परिसरातील भूजल पातळीत वाढ होणार आहे. तसेच लोहमार्ग विस्तारीकरणाच्या कामात गौण खनिज (माती) वापरापोटी जिल्हाधिकारी कार्यालयाला स्वामित्वधन शुल्काची (रॉयल्टी) रक्कमही मिळाली.लोहमार्ग विस्तारीकरणाच्या कामात जलसंधारणाच्या कामाची सांगड घालून अकोट तालुक्यात जलसंधारणाची नऊ कामे पूर्ण करण्यात आली. या कामांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल साठा उपलब्ध झाला आहे. तसेच गौण खनिज वापरापोटी शासनाला ‘रॉयल्टी’देखील प्राप्त झाली.-डॉ. अतुल दोड,जिल्हा खनिकर्म अधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी