शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

धरणात पाणी उपलब्ध; पण ६४ खेड्यांत पाणीटंचाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 14:21 IST

६४ खेड्यांतील ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

- संतोष येलकर

अकोला : धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असला तरी; जुन्या जलवाहिनीची वारंवार होणारी तुटफूट आणि जलवाहिनीला ठिकठिकाणी लागणाऱ्या गळतीमुळे (लिकेजेस) जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातल्या खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन कोलमडत आहे. त्यामुळे धरणात पाणी उपलब्ध असले तरी, ६४ खेड्यांतील ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी जुनी जलवाहिनी शिकस्त झाली असून, वारंवार जलवाहिनीची तुटफूट होते. तसेच जलवाहिनीला ठिकठिकाणी वारंवार गळती (लिकेजेस) लागत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होतो. खांबोरा प्रादेशिक प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत खेड्यांना चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले असले तरी, वारंवार होणारी जलवाहिनीची तुटफूट आणि जलवाहिनीला लागणाºया गळतीमुळे चार दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडत असून, प्रत्यक्षात १० ते १२ दिवसाआड ६४ खेड्यांना पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे धरणात पाणी उपलब्ध असले तरी, ६४ खेड्यातील ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडण्याची अशी आहेत कारणे!

  • -जुन्या जलवाहिनीची वारंवार तूटफूट होणे
  • -जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागणे
  • -वीजपुरवठ्याचे रोहित्र नादुरुस्त होणे
  • -पाणी उचल करण्याचे जुने पंप नादुरुस्त होणे

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत अनेक ठिकाणी जलवाहिनीची तुटफूट होत असल्याने पाणीपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे १० ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. गेल्या १२ दिवसांपासून बंद असलेला पाणीपुरवठा ९ फेबु्रवारी रोजी सुरू झाला. त्यामुळे ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.- दिलीप मोहोडसरपंच, आखतवाडाखांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे; मात्र जुन्या जलवाहिनीची तुटफूट होत असल्याने आणि ठिकठिकाणी जलवाहिनी ‘लिकेज’ होत असल्याने, पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडत आहे.-अनिल चव्हाणशाखा अभियंता, जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा अकोला उपविभाग

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाईKatepurna Damकाटेपूर्णा धरण