शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीच्या ‘लिकेज’मध्ये अडकले ४४ गावांचे पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 14:35 IST

चोहट्टाबाजार ते उगवा फाट्यापर्यंतच्या जुन्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती (लिकेज) लागत असल्याने घुसर येथील टाकीत (सम्प) पाणी पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे टंचाईग्रस्त ४४ गावांना वाण धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी ३ कोटी ६७ लाख रुपयांच्या योजनेला शासनामार्फत मंजुरी देण्यात आली. चोहोट्टा बाजार ते उगवा फाट्यापर्यंत १५ किलोमीटर जुन्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती. जुन्या जलवाहिनीवरील ‘लिकेज’मध्ये टंचाईग्रस्त ४४ गावांना वाण धरणातून पाणी पुरवठा अडकला आहे.

- संतोष येलकर

अकोला: जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ४४ गावांना वाण धरणातून पाणीपुरवठा करण्याच्या योजनेचे काम पूर्ण करण्यात आले असले तरी, चोहट्टाबाजार ते उगवा फाट्यापर्यंतच्या जुन्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती (लिकेज) लागत असल्याने घुसर येथील टाकीत (सम्प) पाणी पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला आहे. जलवाहिनीच्या ‘लिकेज’मध्ये टंचाईग्रस्त ४४ गावांचा पाणीपुरवठा अडकला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी ‘वाण’ चे पाणी केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याच्या पृष्ठभूमीवर धरणातील जलसाठा अकोला शहरासाठी आरक्षित करण्यात आला असून, गत सप्टेंबरपासून खांबोरा पाणी पुरवठा योजनेंतर्गत गावांना धरणातून पाणी पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणी टंचाईग्रस्त गावांना गत आॅक्टोबरपासून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. या पृष्ठभूमीवर खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत टंचाईग्रस्त ४४ गावांना वाण धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी ३ कोटी ६७ लाख रुपयांच्या योजनेला शासनामार्फत मंजुरी देण्यात आली. या योजनेत उगवा फाटा ते घुसरपर्यंत नवीन जलवाहिनी टाकून घुसर येथील ‘सम्प’मधून ४४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी चाहोट्टा बाजार येथे ६० अश्वशक्तीचे सबमर्सिबल पंप बसविण्यात आले असून, जमिनीखाली टाकी (सम्प)चे काम पूर्ण करण्यात आले. तसेच उगवा फाट्यापासून घुसर येथील ‘सम्प’पर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत गत आठवड्यात पूर्ण करण्यात आले. ४४ गावांना पाणीपुरवठा करण्याची चाचणी घेण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामध्ये चोहोट्टा बाजार ते उगवा फाट्यापर्यंत १५ किलोमीटर जुन्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागत असल्याने, नवीन जलवाहिनीद्वारे घुसर येथील ‘सम्प’पर्यंत वाण धरणाचे पाणी पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला आहे. जुन्या जलवाहिनीवरील ‘लिकेज’मध्ये टंचाईग्रस्त ४४ गावांना वाण धरणातून पाणी पुरवठा अडकला आहे. त्यामुळे जलवाहिनीवरील लिकेज दुरुस्तीचे काम केव्हा पूर्ण होणार आणि टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी ‘वाण’चे पाणी केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जुन्या जलवाहिनीवर ७० ठिकाणी ‘लिकेज’ काढण्याचे काम पूर्ण!वान धरणातून अकोला शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी १२ वर्षांपूर्वी चोहोट्टा बाजार ते उगवा फाट्यापर्यंत १५ किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात आली होती. उगवा फाटा ते घुसरपर्यंत नवीन जलवाहिनी टाकून ४४ गावांना वान धरणातून पाणी पुरवठा करण्याच्या योजनेचे काम आता पूर्ण करण्यात आले आहे; परंतु चोहोट्टा बाजार ते उगवा फाट्यापर्यंत जुन्या जलवाहिनी ठिकठिकाणी ‘लिकेज’ होत आहेत. ४ मेपर्यंत जुन्या जलवाहिनीवरील ७० ठिकाणी ‘लिकेज’ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले. लिकेज काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच ४४ गावांना वान धरणातून पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार आहे.ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावरच!खारपाणपट्ट्यातील टंचाईग्रस्त ४४ गावांना वान धरणातून पाणी पुरवठा करण्याच्या योजनेचे काम पूर्ण करण्यात आले असले, तरी अद्याप या गावांपर्यंत ‘वान’चे पाणी पोहोचले नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त ४४ गावांतील ग्रामस्थांना टँकरद्वारे मिळणाऱ्या पाण्यावर तसेच पैसे देऊन विकत घेतलेल्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे.चोहोट्टा बाजार ते उगवा फाट्यापर्यंत जुन्या जलवाहिनीवरील ‘लिकेज’ काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ७० ठिकाणी ‘लिकेज’ काढण्यात आले. लिकेज काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ४४ गावांना वान धरणातून पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार आहे.-सुनील चव्हाण, उपअभियंता, मजीप्रा, अकोला.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी