शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

घनकचऱ्याचा ‘डीपीआर’ खोळंबला; सत्ताधारी, प्रशासनात समन्वयाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 13:13 IST

मागील अनेक महिन्यांपासून घनकचºयाचा ‘डीपीआर’ खोळंबला असून, या मुद्यावर प्रशासन व सत्ताधाºयांमध्ये आपसात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे.

अकोला: कचरा साठवणुकीसाठी नायगावस्थित ‘डम्पिंग ग्राउंड’ची जागा अपुरी पडत आहे. या ठिकाणी साठवणूक केल्या जाणाºया कचºयावर प्रक्रिया होत नसल्याने घाण दुर्गंधीने स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. मनपाच्या हद्दवाढीनंतर शहराचा पाच पट झालेला विस्तार व कचºयाची समस्या लक्षात घेता, कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाने झोननिहाय ‘डम्पिंग ग्राउंड’चे नियोजन केले होते. मागील अनेक महिन्यांपासून घनकचºयाचा ‘डीपीआर’ खोळंबला असून, या मुद्यावर प्रशासन व सत्ताधाºयांमध्ये आपसात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे.शहरातून निघणाºया दैनंदिन कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी नायगावातील १२ एकर जागेवरील ‘डम्पिंग ग्राउंड’चा वापर केला जातो. कचºयावर प्रक्रिया होत नसल्यामुळे या ठिकाणी कचºयाचे ढीग साचले आहेत. परिसरात दुर्गंधी पसरली असून, स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. कचºयामुळे परिसरातील पाण्याचे जलस्रोत दूषित झाले आहेत. त्यामुळे शहरातून कचरा घेऊन जाणाºया मनपाच्या घंटागाडी चालकांना शिवीगाळ करणे, मारहाण करण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. ही समस्या ध्यानात घेता नायगावातील ‘डम्पिंग ग्राउंड’ वरील कचºयावर ठोस प्रक्रिया करण्याची गरज असताना या मुद्यावर मनपा प्रशासन व सत्ताधारी पक्षात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. कचºयावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी शासनाने अमरावती विभागाकरिता ‘मार्स प्लानिंग अ‍ॅन्ड इंजिनिअरिंग सर्व्हिस प्रा. लिमिटेड अहमदाबाद’ या संस्थेची नियुक्ती केली. मध्यंतरी संस्थेने तयार केलेल्या ‘डीपीआर’मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने त्रुटी काढल्याने हा अहवाल रखडला होता. सदर डीपीआरचे पुढे काय झाले, याबद्दल प्रशासनात कमालीचा गोंधळ आहे. एकूणच शहरातील कचºयाच्या समस्येवर प्रशासनासह सत्ताधारी पक्ष कवडीचेही गंभीर नसल्याचा आरोप होऊ लागला आहे.झोननिहाय ‘डम्पिंग ग्राउंड’चा प्रयोग फसला!शहरात तयार होणाºया दैनंदिन कचºयावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. अद्यापपर्यंत घनकचºयाचा डीपीआर तयार नसताना महापालिका झोननिहाय ‘डम्पिंग ग्राउंड’ निर्माण करण्याच्या तयारीत आहे. सुरुवातीला पूर्व झोनमध्ये डम्पिंग ग्राउंडची निर्मिती करण्यात आली होती. हा प्रयोग सपशेल अपयशी ठरला. हा प्रकार कमी म्हणून की काय, घंटागाडी चालक शहरात जागा दिसेल त्या ठिकाणी कचरा टाकून मोकळे होत असल्याने अकोलेकरांना वैताग आला आहे. या समस्येकडे सत्ताधारी डोळेझाक करीत असल्याचा सूर शहरात उमटत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका