शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
4
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
5
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
6
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
7
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
8
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
9
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
10
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
11
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
12
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
13
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
15
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
16
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
17
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
18
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
19
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
20
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  

वारकरी संप्रदाय ही क्रांतिकारी चळवळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 02:07 IST

अकोला: सातशे वर्षांपूर्वी समाजाला बसत असलेले चातुर्वण्र्य अन् विषमतेचे चटके कमी करण्याचे काम करून वेदप्रामाण्य नाकारणारा वारकरी संप्रदाय ही खरी क्रांतिकारी चळवळ होती, असे प्रतिपादन अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी रविवारी येथे केले.

ठळक मुद्देप्रा. श्याम मानव यांचे प्रतिपादन ‘अंनिस’च्या सखोल प्रशिक्षण शिबिराचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सातशे वर्षांपूर्वी समाजाला बसत असलेले चातुर्वण्र्य अन् विषमतेचे चटके कमी करण्याचे काम करून वेदप्रामाण्य नाकारणारा वारकरी संप्रदाय ही खरी क्रांतिकारी चळवळ होती, असे प्रतिपादन अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी रविवारी येथे केले. येथील साईकृपा मंगल कार्यालयात तीन दिवस सुरू असलेल्या सखोल प्रशिक्षण शिबिराच्या समारोप सत्रात ‘संत आणि चमत्कार’ या विषयावर प्रा. मानव बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हर्षवर्धन मालोकार, डॉ. महेंद्र काळे, डॉ. राऊत उपस्थित होते. संत ज्ञानेश्‍वर हे पहिले बंडखोर संत होते; मात्र त्यांच्या नावावर चमत्कार खपविण्यात आलेत. वास्तविक कोणत्याही संताने चमत्कार केले नाहीत. उलट चमत्कार, सिद्धी, दैवी शक्ती, मंत्र-तंत्र कसे खोटे असतात, हे अभंगातून मांडले आहे, हे लक्षात घ्यायला हवे. अतिभक्तीपोटी चरित्र किंवा पोथी लेखकांनी संतांच्या नावावर चमत्कार घुसडले. गाडगेबाबांच्या अंत्ययात्रेत उपस्थित असणारे लोक आजही जिवंत असताना, गाडगेबाबा तुकारामाचे अवतार होते अन् ते सदेह वैकुंठाला गेले, असे बडनेर्‍याच्या उमाळे गुरुजींनी पोथीत लिहिले आहे. गाडगेबाबाबाबत जर असे होत असेल तर ७00 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या संतांच्या चरित्रात किती घोळ झाले असतील, हे लक्षात घ्यायला हवे, असेही आवाहन प्रा. मानव यांनी यावेळी केले. यावेळी शरद वानखडे, पुरुषोत्तम आवारे, अशोक घाटे, संध्या देशमुख, चंद्रकांत झटाले, मंगेश वानखडे, विजय बुरकुले, धम्मदीप इंगळे, संतोष ताले, दिगंबर सांगळे, रुपाली राऊत, किशोर वाघ, प्रतिभा भुतेकर, अँड. शेषराव गव्हाळे, विठ्ठल तायडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

श्रद्धा डोळस हवी!आमचा देव, धर्माला विरोध नाही. कुणाला डोळस श्रद्धा ठेवायची असेल तर माझी हरकत नाही कारण डोळस होणे याचाच अर्थ तर्क, चिकित्सा वापरायला सुरुवात करणे, समाजाची तर्कबुद्धी जागृत करणे एवढेच अंनिसचे काम आहे. हे काम लोकांना कमीत कमी दुखावूनसुद्धा अतिशय प्रभावीपणे करता येते, असेही प्रा. मानव यावेळी म्हणाले.