शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
4
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
5
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
6
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
8
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
9
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
10
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
11
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
12
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
13
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
14
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
15
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
16
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
17
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
18
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
19
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
20
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती

मतदार यादीत घोळ; लोकप्रतिनिधींची मनपात धाव

By admin | Updated: January 26, 2017 10:43 IST

अकोला प्रभाग क्रमांक २, ३ मधील प्रकार; मतदारांच्या पत्त्यात बदल

अकोला: महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत काही ठराविक प्रगणकांनी जाणीवपूर्वक घोळ केल्याचे समोर आले आहे. प्रभाग क्रमांक २ आणि ३ मधील मतदारांच्या पत्त्यात बदल करून कागदोपत्री त्यांची ठिकाणे बदलण्यात आली. यासंदर्भात संबंधित नगरसेवक, कार्यकर्त्यांंनी आक्षेप नोंदवल्यानंतरही आक्षेप निकाली काढल्या जात नसल्याचे पाहून बुधवारी खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष किशोर पाटील मांगटे, सभापती विजय अग्रवाल यांनी मनपात धाव घेतली. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मनपा प्रशासनाने १२ जानेवारी रोजी प्रारूप मतदार याद्या प्रकाशित केल्या. यंदा प्रथमच निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्यासाठी मोबाइल अँप निर्माण केले. संबंधित अँपवरून प्रभागांची मतदार यादी काढून मतदारांची संख्या तपासण्यात आली. यासाठी प्रशासनाने १२0 प्रगणकांची नियुक्ती केली होती. मनपाच्या स्तरावर १२ जानेवारी रोजी प्रारूप मतदार यादी प्रकाशित केल्यानंतर नागरिकांना हरकती व सूचना सादर करण्यासाठी पाच दिवसांचा म्हणजेच १७ जानेवारीपर्यंत अवधी देण्यात आला होता. शेवटच्या दिवसापर्यंंत ३७७ जणांनी मनपाकडे हरकती व सूचना नोंदवल्या. मनपा आयुक्त अजय लहाने यांच्या स्तरावर हरकती व सूचनांचा निपटारा केला जात असला, तरी बहुतांश प्रभागातील मतदारांची गठ्ठा नावे दुसर्‍याच प्रभागात सामील झाल्यामुळे विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांमध्ये भिती पसरली आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रभाग क्रमांक २ आणि ३ मधील मतदारांच्या पत्त्यात अदला-बदल करण्यात आली असून, हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचा काही नगरसेवक व भाजपाच्या कार्यकर्त्यांंचा आक्षेप आहे. संबंधित प्रगणकांची भूमिका संशयास्पद ठरत आहे. या प्रकाराची दखल घेत बुधवारी लोकप्रतिनिधींनी मनपा उपायुक्त समाधान सोळंके यांची भेट घेतली. आक्षेप तातडीने निकाली काढण्याचे निर्देश उपायुक्तांना देण्यात आले आहेत. दरम्यान या संदर्भात आयुक्त अजय लहाने यांना विचारणा केली असता त्यांनी सदर प्रकरणाची चौकशी करणार असून चौकशीअंती दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल अशी माहिती दिली.