शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

विश्व हिंदू परिषदेची ‘शेतकरी जागर यात्रा’ १५ जानेवारीपासून; ८३ तालुक्यांमधून जाणार यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 19:05 IST

विश्व हिंदू परिषदेच्यावतीने १५ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत विदर्भात बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा व गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी या दोन ठिकाणांहून ‘शेतकरी जागर यात्रा’ काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा व गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी या दोन ठिकाणांहून ‘शेतकरी जागर यात्रा’ काढण्यात येणारया यात्रेत डीजीटल रथ राहणार असून, मोठ्या एलईडी स्क्रीनद्वारे जैविक शेती, गोपालन आदींचा जागर केला जाणार आहे.यात्रा २५५१ किमीचा प्रवास करून वर्धा येथे २६ जानेवारी रोजी या यात्रेचा समारोप होणार आहे.

अकोला : शेतकऱ्यांमधील कृषीधर्म जागृत करून, त्यांना गोवंश पालनाचे महत्व समजावून सांगणे, रसायनमुक्त शेतीसाठी प्रोत्साहीत करणे या उद्देशाने विश्व हिंदू परिषदेच्यावतीने १५ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत विदर्भात बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा व गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी या दोन ठिकाणांहून ‘शेतकरी जागर यात्रा’ काढण्यात येणार असून, वर्धा येथे या यात्रेचा समारोप होणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेकडून सोमवारी येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.येथील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना सनतकुमार गुप्ता यांनी सांगितले की, शेतकरी बांधवांमधील कृषीधर्म जागृत करण्यासाठी विदर्भात दोन शेतकरी जागर यात्रा काढण्यात येणार आहेत. जिजाऊंची जन्मभूमी सिंदखेड राजा आणि अहेरी येथून या यात्रांचा शुभारंभ होणार आहे. एकून दहा दिवस चालणारी ही यात्रा २५५१ किमीचा प्रवास करणार आहे. स्वदेशीचा मुलमंत्र देणारे महात्मा गांधी व विनोबा भावे यांची कर्मभूमी वर्धा येथे २६ जानेवारी रोजी या यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेत डीजीटल रथ राहणार असून, मोठ्या एलईडी स्क्रीनद्वारे जैविक शेती, गोपालन आदींचा जागर केला जाणार आहे. या स्क्रिनवर जैविक शेती यशस्वी करणाºया शेतकºयांच्या मुलाखती, गो-विज्ञान अनुसंधान केंद्र, देवलापार व गो-सेवा केंद्र, म्हैसपूर या संस्थांनी केलेल्या अनुसंधानपर प्रयोगांची माहिती देण्यात येईल. तसेच या यात्रेतून गोवंश पालनातून समृद्धीकडे कसे जाता येईल, याविषयी प्रत्यक्ष होत असलेल्या कामाची चित्रफीत प्रदर्शीत केल्या जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेस संयोजक अ‍ॅड. अमोल अंधारे, अटल पांडे, महेंद्र देशमुख, गोविंदराव शेंडे, हेमंत थोरात, सुरज भगेवार, डॉ. संजय एकापूरे, राजेश्वर निवळ आदींची उपस्थिती होती.दररोज दोन शेतकरी मेळावे, ३ कृषी वार्ताया यात्रेदरम्यान, दररोज दोन शेतकरी मेळावे, ३ कृषी वार्ता व ३ कृषी चर्चा, रात्री कृषी किर्तन होणार आहे. विदर्भातील ८३ तालुक्यातील गावांमधील लाखो शेतकºयांशी संवाद साधण्यात येणार आहे. गोवंश पालनासोबत जैवीक शेतीचे यशस्वी प्रयोग करणारे शेतकरी या यात्रेत मार्गदर्शन करणार आहेत. गोवंश पालन व जैविक शेती करणााºया शेतकºयांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरFarmerशेतकरी