शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

साथरोग सदृश आजार ठरताहेत ‘ताप’दायक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 14:12 IST

वातावरण बदलामुळे नागरिकांमध्ये आरोग्यविषयक समस्या जाणवू लागल्याने जिल्हाभरातील दवाखाने, रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे.

ठळक मुद्दे बहुतांश रुग्णांमध्ये साथरोग सदृश आजारांची लक्षणे दिसून येत आहेत.जिल्हाभरातील दवाखाने, रुग्णालये हाऊसफुल्ल झाले आहेत. जिल्ह्यात डेंग्यू किंवा चिकुनगुनियाचा रुग्ण आढळला नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

अकोला: जिल्ह्यात डेंग्यू, चिकुनगुनिया सदृश तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, अनेक रुग्णांमध्ये डोकेदुखी, हातापायात दुखण्याच्या समस्या दिसून येत आहेत. साथरोग सदृश आजार अकोलेकरांसाठी तापदायक ठरत असून, जिल्हाभरातील दवाखाने, रुग्णालये हाऊसफुल्ल झाले आहेत.वातावरण बदलामुळे नागरिकांमध्ये आरोग्यविषयक समस्या जाणवू लागल्याने जिल्हाभरातील दवाखाने, रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे. यातील बहुतांश रुग्णांमध्ये साथरोग सदृश आजारांची लक्षणे दिसून येत आहेत. विशेषत: डेंग्यू, चिकुनगुनिया या आजाराची लक्षणे दिसून येत असल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. असे असले, तरी गत आठवडाभरात जिल्ह्यात डेंग्यू किंवा चिकुनगुनियाचा रुग्ण आढळला नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे; मात्र डेंग्यू आणि चिकुनगुनियाची लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.डेंग्यू, चिकुनगुनियाची लक्षणे

  • अचानक थंडी वाजून ताप येणे
  • डोकेदुखी, शरीर बधिर होणे
  • पाठ दुखीचा त्रास
  • भूक मंदावणे, जेवणाची इच्छा न होणे
  • शरीर वाकल्यासारखे होणे

स्वाइन फ्लूपासून राहा सावध!वातावरणातील बदलामुळे स्वाइन फ्लूचाही धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वाइन फ्लूपासून सावध राहण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.स्वाइन फ्लूची लक्षणेताप, डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा, छातीत दुखणे, घशात खवखवणे, सर्दी आदी लक्षणे आहेत.हे करा

  • घर व परिसरात स्वच्छता पाळा
  • छतावर किंवा इतर ठिकाणी पाणी साठवणे टाळा
  • शिळे अन्न खाण्यास टाळा
  • पाणी उकळून प्यावे
  • उघड्यावरील पदार्थांचे सेवन टाळा
  • मॉस्किटो मॅट किंवा मच्छरदाणीचा उपयोग करा

रुग्णांमध्ये साथीच्या आजारांची लक्षणे दिसून येत आहेत. मात्र, यातील काही लक्षणे वातावरणातील बदलांचाही परिणाम असू शकतो. असे असले, तरी नागरिकांनी याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करावा. आजारांपासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य