शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी बंद पाडले पिंजर-निहीदा मार्गावरील पुलाच्या दुरुस्तीचे काम  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 17:25 IST

बहिरखेड (जि. अकोला): बार्शीटाकळी तालुक्यातील निहिदा ते पिंजर मार्गावरील पिंजर्डा नदीवरील जुन्या पुलाची दुरुस्ती करण्याऐवजी या ठिकाणी नवीन व उंच पुल बांधावा, अशी मागणी करीत, परिसरातील सहा गावांचे सरपंच व ग्रामस्थांनी मंगळवारी पुलाच्या दुरुस्तीचे काम बंद पाडले.

ठळक मुद्देअचानक जाग आलेल्या बांधकाम विभागाने या पुलाचे भगदाड बुजविण्यासाठी २ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला व २० मार्च रोजी कामाला सुरुवात केली. ही बाब समजताच मौजा बहिरखेड, निहिदा, सावरखेड, जमकेश्वर, पिंपळगाव हांडे आणि धाकली येथील सरपंच व ग्रामस्थांनी मंगळवारी पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला विरोध केला.सरपंच व ग्रामस्थांनी बुधवार २१ मार्च रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम जि. प. अकोला यांना निवेदन देऊन नवीन पुल बांधण्याची मागणी केली.

-  किरण ठाकरे बहिरखेड (जि. अकोला): बार्शीटाकळी तालुक्यातील निहिदा ते पिंजर मार्गावरील पिंजर्डा नदीवरील जुन्या पुलाची दुरुस्ती करण्याऐवजी या ठिकाणी नवीन व उंच पुल बांधावा, अशी मागणी करीत, परिसरातील सहा गावांचे सरपंच व ग्रामस्थांनी मंगळवारी पुलाच्या दुरुस्तीचे काम बंद पाडले. वारंवार थातुरमातुर दुरुस्ती करण्याऐवजी कायमस्वरुपी नवीन पुल बांधण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी बुधवारी जिल्हा परिषद बांधकाम विभागास दिले.निहिदा- पिंजर मार्गावरील नदीवर गेल्या ३० ते ३५ वर्षापूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. काळाच्या ओघात कमकुवत झालेल्या या पुलाची अतिशय दयनिय अवस्था झालेली असून, पुलावर मोठे भगदाड पडले आहे. सदर रस्ता हा अकोला जि. प. बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याने, ग्रामस्थांनी या मार्गावर नवीन पुलाची बांधणी करून उंच पूल तयार करण्याची मागणी संबंधित विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.२ परंतु जि. प. बांधकाम विभागाकडून या मागणीची दखल घेतल्या गेली नाही. आता आर्थिक वर्ष संपत आल्याचे पाहून अचानक जाग आलेल्या बांधकाम विभागाने या पुलाचे भगदाड बुजविण्यासाठी २ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला व २० मार्च रोजी कामाला सुरुवात केली. ही बाब समजताच मौजा बहिरखेड, निहिदा, सावरखेड, जमकेश्वर, पिंपळगाव हांडे आणि धाकली येथील सरपंच व ग्रामस्थांनी मंगळवारी पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला विरोध केला. हा पूल शिकस्त झालेला असून , त्याला मलमपट्टी कशाला करता, त्याऐवजी नवीन पुलाचे बांधकाम करा, असे म्हणत ग्रामस्थांनी शिकस्त झालेल्या पुलाच्या दुरुस्तीचे काम बंद पाडले. एवढेच नव्हे, तर सरपंच व ग्रामस्थांनी बुधवार २१ मार्च रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम जि. प. अकोला यांना निवेदन देऊन नवीन पुल बांधण्याची मागणी केली.पुलावरून ९ ते १० गावांची वर्दळनिहिदा ते पिंजय या रस्त्यावर ९ ते १० गावे आहेत. पिंजर हे मुख्य बाजारपेठ असल्याने शाळकरी विद्यार्थी व ग्रामस्थांना दररोज या मार्गावरील पुलावरून ये-जा करावी लागते. पावसाळ्यात नदीला पुर येऊन नेहमीच हा पुल वाहतुकीसाठी बंद असतो. त्यामुळे परिसरातील १० गावातील लोकांनी खासदार, आमदार यांच्याकडे निवेदन देऊन या मार्गावर नवीन पुलाची निर्मिती करण्याची मागणी लावून धरली आहे. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदsarpanchसरपंच