अकोला जिल्ह्यातील ५१० गावांत ग्रामस्थांना मिळत नाही ५५ लीटर पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 10:45 AM2020-11-18T10:45:01+5:302020-11-18T10:49:50+5:30

Akola News ५१० गावांतील ग्रामस्थांना दरडोई प्रतिदिवस ५५ लीटर पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे.

Villagers in 510 villages in Akola district do not get 55 liters of water! | अकोला जिल्ह्यातील ५१० गावांत ग्रामस्थांना मिळत नाही ५५ लीटर पाणी!

अकोला जिल्ह्यातील ५१० गावांत ग्रामस्थांना मिळत नाही ५५ लीटर पाणी!

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात सात प्रादेशिक, ४९६ स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांव्दारे पाणी पुरवठा.ग्रामस्थांना दरडोई प्रती दिवस ४० लीटर किंवा त्यापेक्षा कमी पाणी मिळत आहे.

अकोला: जिल्ह्यातील ग्रामीण भागात सात प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आणि ४९६ स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत जिल्ह्यातील २०६ गावांतील ग्रामस्थांना दरडोई प्रती दिवस ५५ लीटर पाणी पुरवठा करण्यात येत असला तरी, जिल्ह्यातील ५१० गावांतील ग्रामस्थांना दरडोई प्रतिदिवस ५५ लीटर पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे.

शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबास २०२४ पर्यंत नळजोडणीव्दारे दरडोई प्रती दिवस ५५ लीटर पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यात सद्यस्थितीत सात प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांतर्गत व ग्रामपंचायतींच्या ४९६ स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांव्दारे पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांतर्गत २०६ गावांतील ग्रामस्थांना दरडोई प्रती दिवस ५५ लीटर पाणी पुरवठा करण्यात येत असून, जिल्ह्यातील ५१० गावांतील ग्रामस्थांना दरडोई प्रती दिवस ४० लीटर किंवा त्यापेक्षा कमी पाणी मिळत आहे.

किती दिवसाआड मिळते पाणी

अकोट येथील ८४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ३ दिवसाआड.

अकोला तालुक्यातील खांबोरा ६० खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत १० ते १२ दिवसाआड.

खांबोरा ४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ३ दिवसाआड.

बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर १० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत २ दिवसाआड.

बाळापूर तालुक्यातील लोहारा २ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत दररोज.

बाळापूर तालुक्यातील वझेगाव २ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत दररोज.

मूर्तिजापूर तालुक्यातील लंघापूर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ११ गावांना ........ दिवसाआड.

 

एकाही गावात नाही पाणीटंचाई!

यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील धरणे, तलाव, विहिरींमध्ये लक्षणीय जलसाठा उपलब्ध असून, नदी व नाले वाहत असल्याच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत जिल्ह्यातील एकाही गावात पाणीटंचई नाही.

 

६९९ गावांसाठी २२७ योजनांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले!

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ६९९ गावांमध्ये ग्रामस्थांना दरडोई प्रती दिवस ५५ लीटर पाणी उपलब्ध करण्यासाठी २२७ याेजनांचे प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.

 

जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांतर्गत २०६ गावांत दरडाेई प्रतिदिवस ५५ लीटर पाणी उपलब्ध करण्यात येत आहे. ५१० गावांत दरडोई प्रतिदिवस ४० लीटर किंवा त्यापेक्षा कमी पाणी मिळत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ६९९ गावांत दरडाेई प्रतिदिवस ५५ लीटर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी २२७ योजनांचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले.

 ए.ए. खान उपकार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद.

Web Title: Villagers in 510 villages in Akola district do not get 55 liters of water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.