शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या २१ फेबु्रवारीला होणार प्रसिद्ध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 14:37 IST

कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यातील थकबाकीदार १ लाख १३ हजार ८४९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले.

अकोला : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात थकबाकीदार १ लाख १३ हजार ८४९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या २१ फेबु्रवारी रोजी जिल्हा प्रशासनामार्फत प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत गत १ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकºयांसाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यातील थकबाकीदार १ लाख १३ हजार ८४९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, त्यामध्ये राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँक, व्यापारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदार शेतकºयांचा समावेश आहे. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांपैकी बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात आलेल्या पात्र शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याची प्रक्रिया प्रशासनामार्फत सुरू आहे. शेतकºयांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या गावनिहाय याद्या २१ फेबु्रवारी रोजी जिल्हा प्रशासनामार्फत प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या याद्या जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रसिद्ध होणार असल्याने, कर्जमाफीस पात्र ठरलेल्या संबंधित शेतकºयांना यादीमधील नाव गावातच पाहता येणार आहे.१ लाख ८ हजार शेतकºयांच्या याद्या पोर्टलवर ‘अपलोड’!कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख १३ हजार ८४९ थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आलेल्या शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू आहे. शनिवार, ८ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ८ हजार शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात आल्या आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.

 

टॅग्स :FarmerशेतकरीAkolaअकोला