स्वच्छतेसाठी गावपातळीवर श्रमदान मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:23 AM2021-09-17T04:23:23+5:302021-09-17T04:23:23+5:30

अकोला : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम ...

Village level labor campaign for cleanliness | स्वच्छतेसाठी गावपातळीवर श्रमदान मोहीम

स्वच्छतेसाठी गावपातळीवर श्रमदान मोहीम

Next

अकोला : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत दिनांक १७ सप्टेंबर रोजी स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम गाव स्तरावर राबविण्यात यावी आणि या मोहिमेमध्ये ग्रामस्थ, गाव स्तरावरील कर्मचारी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

या श्रमदान मोहिमेमध्ये ग्रामपंचायत हागणदारीमुक्त अधिक घोषित करण्यासाठी आवश्यक कामे जसे, सार्वजनिक ठिकाणी साफसफाई करणे, वैयक्तिक शोषखड्डा, सार्वजनिक शोषखड्डे व खत खड्ड्यांचे बांधकाम करणे आणि प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी यावेळी श्रमदान करण्यात येणार आहे.

या मोहिमेदरम्यान कोविड-१९ आणि निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अशा सूचना कटियार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.

विविध उपक्रम राबविणार

‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाच्या कालावधीत एकदा वापरण्यात येणारे प्लास्टिक, (सिंगल युज प्लास्टिक) बंदीबाबत ग्रामपंचायतीने दिनांक २० सप्टेंबर रोजी कार्यवाही करणे, गाव हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) घोषित करण्यासाठी तारीख निश्चित करणे, २५ सप्टेंबर रोजी सरपंच संवाद, २ ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत दिवस साजरा करणे, ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छ ग्रही, स्वच्छता प्रेरक व स्वच्छतेमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सत्कार करणे आदी उपक्रम या मोहिमेदरम्यान राबविले जाणार आहेत.

Web Title: Village level labor campaign for cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.