पोलीस कल्याण निधीतून दक्षता पेट्रोल पंपाचा उद्घाटन सोहळा पार पडला. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, आयओसीएलचे महाप्रबंधक एन. पी. रोडगे, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यावेळी उपस्थित होते. संचालन नीलेश घाडगे यांनी केले. आभार अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी मानले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेष सपकाळ, गृह विभागाचे पाेलीस उपअधीक्षक नितीन शिंदे, पाेलीस निरीक्षक श्रीधर गुलसुंदरे, पोलीस निरीक्षक डी. सी. खंडेराव, दहशतवाद विराेधी कक्षाचे प्रमुख तथा रामदास पेठचे ठाणेदार विलास पाटील, वाहतूक शाखा प्रमुख गजानन शेळके, पाेलीस निरीक्षक विजय नाफडे, जुने शहरचे ठाणेदार महेंद्र देशमुख, महेंद्र कदम, किशोर वानखेडे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस कल्याण निधीसाठी दक्षता पेट्राेल पंप कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:20 IST