शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

विधी महाविद्यालय प्रवेशाकडे विद्यार्थ्यांंनी फिरविली पाठ!

By admin | Updated: October 13, 2016 02:55 IST

अमरावती विभागातील परिस्थिती; बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांचा फटका.

अकोला, दि. १२- बार कौन्सिल ऑफ इंडिया व राज्य शासनाच्या आठमुठे धोरणामुळे विधी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांंनी अक्षरश: पाठ फिरविली आहे. तीन आणि पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाला विद्यार्थी प्रवेशच घेत नसल्याची परिस्थिती अमरावती विभागातील ११ महाविद्यालयांमध्ये दिसून येत आहे. तीन वर्षीय अभ्यासक्रमाला केवळ ४५ टक्के विद्यार्थ्यांंनी प्रवेश घेतला आहे, तर पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाला केवळ २२ टक्के विद्यार्थ्यांंनी प्रवेश घेतल्याची बाब समोर आली आहे. विधी अभ्यासक्रमासाठी यावर्षी प्रथमच राज्य शासनाने सीईटी घेतली. त्यामुळे विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली. त्यात बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांमुळे विद्यार्थ्यांंमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ऑगस्ट महिन्यात विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आटोपते; परंतु यावर्षी २१ सप्टेंबरपासून विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश फेरीसाठीची प्रक्रिया सुरू झाली. प्रवेश प्रक्रिया लांबल्यामुळे आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या जाचक अटींमुळे विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या हजारो विद्यार्थ्यांंंनी पाठ फिरविली तर शेकडो विद्यार्थ्यांंनी सीईटीच्या निर्णयामुळे मध्य प्रदेशातील विधी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला. एवढेच नाही, तर बार कौन्सिल ऑफ इंडियाने अनेक जाचक अटी लादून अनेक महाविद्यालयांची मान्यतासुद्धा काढून घेतली आणि लाखो रुपयांचे मान्यता शुल्क भरल्याशिवाय विधी महाविद्यालयांना मान्यता देणार नसल्याची भूमिका बार कौन्सिल ऑफ इंडियाने घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांंंमध्ये संभ्रम निर्माण झाला. ऐनवेळेवर सीईटी परीक्षेचा निर्णय घेतल्याने, विद्यार्थी गोंधळात पडले. सीईटीची तयारी केली नसल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांंंनी सीईटी परीक्षाच दिली नाही. बारावी परीक्षेत प्राविण्यश्रेणीचे गुण मिळवून विद्यार्थ्यांंंना प्रवेश नाकारण्यात आला. विशेष म्हणजे सीईटीमध्ये शुन्य गुण मिळणार्‍या विद्यार्थ्यांंंना मात्र विधी अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याची भूमिका बार कौन्सिल ऑफ इंडियाने घेतल्यानंतरही विद्यार्थ्यांंंनी विधी अभ्यासक्रमाकडे पाठ फिरविली, त्यामुळे अमरावती विभागातील अकराही विधी महाविद्यालयांमधील हजारो जागा रिक्त आहेत.

अमरावती विभागातील जागा व प्रवेशाची परिस्थितीजिल्हा               जागा              प्रवेशअमरावती           ३६0(३ वर्ष)      १८६                         २४0(५ वर्ष)     ११२अकोला               ३00(३ वर्ष)     १८0                         १२0(५ वर्ष)      ३१बुलडाणा             १२0(३ वर्ष)       ८२                         १२0(५ वर्ष)       ४७ यवतमाळ           १८0(३ वर्ष)      १२३                        १८0(५ वर्ष)        ८९वाशिम                 ६0(३ वर्ष)       ४२                          ६0(५ वर्ष)        २१.......................................................                            १६२0            ९१३७0७ जागा रिक्त अमरावती विभागातील ११ महाविद्यालयांमध्ये तीन वर्षीय व पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या १६२0 जागा आहेत. यापैकी ९१३ विद्यार्थ्यांंंनी या दोन्ही अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. यंदा विधी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांंंनी पाठ फिरविल्यामुळे अनेक विधी महाविद्यालयांमधील ७0७ जागा रिक्त राहणार आहेत. --शासनाने अचानक सीईटी परीक्षा घेतली. त्यामुळे हजारो विद्यार्थी सीईटीची तयारी करू शकले नाहीत. प्रवेश प्रक्रिया लांबली. हजारो विद्यार्थी विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत; परंतु सीईटीमुळे त्यांना पर्याय शोधावा लागत आहे. शासनाने सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांंंना प्रवेश द्यायला हवा. रत्ना चांडक, प्राचार्यअकोला विधी महाविद्यालय.