शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

vidhan sabha 2019 : सोशल मीडियावर चढला राजकीय रंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 18:29 IST

राजकीय नेत्यांना ट्रोल करण्यासोबतच काही मुद्यांना भावनिकतेची जोड देत मतदारांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्नही सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू आहे.

अकोला: विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या सोशल मीडियावर राजकीय रंग चढला आहे. विविध राजकीय मुद्यांना भावनिकतेची जोड देण्याचा प्रयत्नही या माध्यमातून होत आहे. त्याचा तरुणाईच्या मनावर काय परिणाम होतो, हे निवडणुकीच्या निकालानंतरच दिसेल; पण सध्या तरी या राजकीय मुद्यांवर सोशल मीडियावर चांगलेच घमासान रंगले आहे.देशात सध्या आर्थिक मंंदी अन् बेरोजगारीचा मुद्दा गंभीर झाला आहे. त्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने स्थानिक मतदारसंघाच्या विकासाचाही मुद्दा मतदारांमध्ये चर्चेचा विषय होत आहे. गावकट्टा ते सोशल मीडियावर या चर्चेला उधाण आले असून, विविध राजकीय नेत्यांना नेटकरी चांगलेच ट्रोल करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय नेत्यांची आश्वासने अन् स्थानिक विकास कामांची वास्तविकता यावरून सत्ता पक्षांसोबतच विरोधी पक्षाच्या उमेदवारांचीही व्हाट्स अ‍ॅप, फेसबुक, ट्युटरसारख्या सोशल माध्यमांवर नेटकऱ्यांकडून चांगलीच कानउघाडणी सुरू झाली आहे. यासोबतच यंदाच्या निवडणुकीत उमेदवाराला कोणत्या कामासाठी मतदान कराल, असाही सवाल नेटकऱ्यांकडून विचारल्या जात आहे. विविध मुद्यांवर राजकीय नेत्यांना ट्रोल करण्यासोबतच काही मुद्यांना भावनिकतेची जोड देत मतदारांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्नही सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू आहे.

टॅग्स :AkolaअकोलाSocial Mediaसोशल मीडियाPoliticsराजकारणElectionनिवडणूक