शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : चित्र-विचित्रला निर्मिती, दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक; अ.भा. मराठी नाट्य परिषद विभागीय एकांकिका स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 22:19 IST

अकोला, दि. 12 - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईच्यावतीने आयोजित डॉ. लक्ष्मणराव देशपांडे एकांकिका स्पर्धेची विदर्भ विभागीय प्राथमिक फेरी ...

अकोला, दि. 12 - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईच्यावतीने आयोजित डॉ. लक्ष्मणराव देशपांडे एकांकिका स्पर्धेची विदर्भ विभागीय प्राथमिक फेरी अकोल्यातील श्री शिवाजी महाविद्यालयातील वसंत सभागृह येथे मंगळवारी घेण्यात आली. या स्पर्धेत अमरावती शाखेच्या चित्र-विचित्र नाटकाने सर्वाधिक पारितोषिक पटकावली. निर्मिती व दिग्दर्शनात चित्र-विचित्रने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. सकाळी स्पर्धेचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नियामक मंडळाचे सदस्य दिलीप देवरणकर, प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, ज्येष्ठ नाट्य कलावंत दिलीप देशपांडे, अकोला-मलकापूर शाखा अध्यक्ष प्रा.मधू जाधव, कार्याध्यक्ष डॉ. गजानन नारे व्यासपीठावर विराजमान होते. करंजीकर यांनी मार्गदर्शन केले.स्पर्धेत एकूण पाच नाटके सादर करण्यात आली. यामध्ये दर्दपोरा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मलकापूर-अकोला शाखेने सादर केले. यामधील स्त्री कलावंत वैष्णवी जोशी हिने अभिनयाचे द्वितीय पारितोषिक मिळविले. अकोला शाखेने अल्पविराम सादर केले. लेखन इरफान मुजावर यांचे, तर दिग्दर्शन अनिल कुळकर्णी यांचे होते. डॉ. ज्ञानसागर भोकरे व मयूर भालतिलक यांनी अभिनय केला. या नाटकातील दोन्ही पात्रांना अभिनयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. कारंजा लाड शाखेने उंच माझा झोका गं नाटक केले, तर अमरावती शाखेचे चित्र-विचित्र नाटक ाने रसिकांची दाद मिळविली. आजच्या युवापिढीची राजकारण, समाज व्यवस्थेमुळे होत असलेली मनाची घुसमट युवा कलावंतांनी मांडली. पथनाट्याद्वारा जनजागृती करीत असलेले युवक पुढे नक्षलवादी बनतात, असे यामध्ये दाखविले. नक्षलवाद्यांच्या जीवनावर आधारित या नाटकाने प्रत्येक संवादावर प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या. चित्र-विचित्रने निर्मितीचे प्रथम पारितोषिक आणि दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक पटकाविले. नाटकाला विशाल तराळ यांचे दिग्दर्शन लाभले. अभिनयामध्ये श्रीवेश पांडे याने द्वितीय क्रमांक मिळविला. नागपूर महानगर शाखेने अ‍ॅट द रेट तमन्ना नाटक सादर केले. या नाटकालाही प्रेक्षकांनी दाद दिली. तमन्नाला निर्मितीचे आणि दिग्दर्शनाचे द्वितीय पारितोषिक मिळाले. सलीम शेख यांचे दिग्दर्शन तमन्नाला लाभले, तर अभिनयाचे प्रथम पारितोषिक तमन्नातील पुरुष कलावंत सचिन गिरी यांनी पटकाविले. स्त्री कलावंत मंजिरी सोळंके, वैष्णवी बडगे आणि निशिगंधा तिडके यांनी अभिनयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.