शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

विदर्भात वनौषधी, सुगंधी वनस्पती क्षेत्र वाढणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 5:06 PM

अकोला : विदर्भात वनौषधी,सुंगधी वनस्पतीचे क्षेत्र वाढून,शेतकºयांना मुल्यवर्धीत शेती करण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पाऊल उचलले आहे. 

ठळक मुद्देडॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही एम भाले यांनी  वाशीम येथे बाबा रामदेव यांची भेट घेऊन या विषयावर सकारात्मक चर्चा केली आहे. वनौषधी प्रजातीच्या प्रसिद्धीसाठी उपक्रम राबविण्यात येत असून ‘बायो विलेज ’संकल्पाना साकरण्यासाठी सुद्धा विद्यापीठ प्रयत्नशील आहे.अतिशय पुरातन व जवळपास ५२० चे वर औषधी प्रजाती जोपासणाºया उद्यानाची नोंद केंद्र स्थरावर सुद्धा झाली आहे.

अकोला : विदर्भात वनौषधी,सुंगधी वनस्पतीचे क्षेत्र वाढून,शेतकºयांना मुल्यवर्धीत शेती करण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पाऊल उचलले असून, विद्यापीठाने पतंजली समूहासोबत चर्चा करू न काही सकारात्मक सामंजस्य करार करता येतील का याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही एम भाले यांनी  वाशीम येथे बाबा रामदेव यांची भेट घेऊन या विषयावर सकारात्मक चर्चा केली आहे. भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली, राष्ट्रीय औषधी व वनस्पती मंडळ, नवी दिल्ली यांचे सह केंद्रीय औषधी व सुगंधी व वनस्पती केंद्र,लखनऊच्या  सहयोगाने वनौषधी प्रजातीच्या प्रसिद्धीसाठी उपक्रम राबविण्यात येत असून ‘बायो विलेज ’संकल्पाना साकरण्यासाठी सुद्धा विद्यापीठ प्रयत्नशील आहे.वैदर्भीय शेती शाश्वत व शेतकरी संपन्न होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाद्वारे विविध पयार्यांचा प्रचार व प्रसार करण्यात येत  आहे. जिरायती शेतीला पूरक व्यवसायाची आणखी साथ मिळाल्यास. या भागातील शेतीला निश्चितच चांगले दिवस येतील.विद्यापीठाच्या विविध विभागांनी याकामी अनेक राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय  संस्थांसोबत उत्पादन व प्रक्रीया संदर्भात सामंजस्य करार करीत शेतीला स्थैर्य प्रदान करण्यासाठी आपली भूमिका बजावली आहे.  शेतीआधारित व्यवसायांच्या या मालिकेत औषधी व सुगंधी वनस्पतीचे महत्व व मागणी लक्षात घेता विद्यापीठाने नागार्जुन वनौषधी उद्यानाची निर्मिती सन १९७६ साली केली असून अतिशय पुरातन व जवळपास ५२० चे वर औषधी प्रजाती जोपासणाºया उद्यानाची नोंद केंद्र स्थरावर सुद्धा झाली आहे. मौल्यवान औषधी व सुगंधी वनस्पतीचे संकलन व संवर्धन, ओळख, उपयोगिता व लागवड पद्धतीच्या प्रचार-प्रसारासाठी विविध प्रशिक्षणे व कार्यशाळाचे आयोजन या विभागाद्वारे करण्यात येते. भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली, राष्ट्रीय औषधी व वनस्पती मंडळ, नवी दिल्ली यांचे सह केंद्रीय औषधी व सुगंधी व वनस्पती केंद्र, शास्त्रीय दृष्टीकोनातून विद्यापीठाद्वारे शेतकरी हितासाठी राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांची माहिती देतांना डॉ.  भाले यांनी  औषधी व सुगंधी वनस्पती विभागाच्या उपलब्धी बाबत रामदेव बाबांना अवगत केले व विद्यापीठाकडे उपलब्ध जमीन, साधन सामुग्री याचा उपयोग करून औषधी निर्मितीसाठी भरीव योगदान देण्याबाबत आपली बांधिलकी व्यक्त केली. तसेच शेतकºयांचे गट तयार करून पतंजली समूहाला लागणारा कच्चा माल उत्पादित करण्याचे तंत्र व इतर सहाय करता येईल असे आश्वासीत करण्यात आले. या भेटी प्रसंगी विधान सभा सदस्य आ. राजेंद्र पाटणी, किसान सेवा समितीचे राज्य प्रमुख (पूर्व) राधेश्याम धूत यांचे सह विद्यापीठाच्या नागार्जुन वनौषधी उद्यानाच्या प्रमुख डॉ. वर्षा टापरे, सेवा निवृत्त माजी प्रमुख डॉ. संजय वानखडे, सहयोगी प्राध्यापक डॉ.नितीन पतके , वाशीम येथील संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विकास गौड यांची उपस्थिती होती.

 वनौषधी,सुंगधी वनस्पती लागवडीसंदर्भात बाबा रामदेव यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असे झाल्यास विदर्भात या मुल्यवर्धीत पिकांना शेतीला चांगले दिवस येतील. - डॉ. व्ही.एम.भाले, कुलगुरू , डॉ. पंदेकृवि,अकोला. 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठpatanjaliपतंजली