शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील ४० टक्क्यांवर उत्पादन घटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:16 IST

विदर्भातील जवळपास २० ते २५ लाख हेक्टरवरील पिकांना धोका निर्माण झाला असून, यावर्षी ४० टक्क्यांवर उत्पादनात घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

- राजरत्न सिरसाटअकोला : मान्सून विलंबाने आल्याने पेरणीस उशीर झाला; अल्प पावसात पेरण्या सुरू असतानाच पुन्हा चार आठवडे पावसाने दडी मारल्याने विदर्भातील जवळपास २० ते २५ लाख हेक्टरवरील पिकांना धोका निर्माण झाला असून, यावर्षी ४० टक्क्यांवर उत्पादनात घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.राज्यात आजमितीस ८० टक्क्यांवर पेरण्या आटोपल्या आहेत. विदर्भातील अमरावती विभागात ९३ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. तथापि, नागपूर विभागातील चित्र वेगळे आहे. या विभागातील सात लाख हेक्टरवर शेतकरी धान पीक घेतात; परंतु पाऊसच नसल्याने यातील ६० टक्के क्षेत्रावरील धान पिकाची रोवणी रखडली आहे. दोन्ही विभागात धानासोबतच सोयाबीन, कापूस पेरणीच क्षेत्र प्रत्येकी १५ लाख हेक्टर आहे. गळीत, तृण, कडधान्य मिळून विदर्भात खरीप हंगामातील ४९ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीलायक आहे; परंतु आजमितीस कोरडवाहू क्षेत्रावरील पीक शेवटच्या घटका मोजत आहे. त्यामुळे पाऊस आला तरी खुंटलेल्या पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळणे कठीण असल्याने हजारो शेतकऱ्यांना अर्ध रब्बी, रब्बी पिकांचे नियोजन करण्याची वेळ आली आहे. पुण्याच्या कृषी आयुक्तालयानेदेखील यासाठीचे आपत्कालीन पीक नियोजन केले आहे. ३१ जुलैपर्यंत पेरणी करायची असल्यास संकरित बाजरी, सूर्यफूल, सोयाबीन अधिक तूर, बाजरी अधिक तूर, एरंडी अधिक धने (मिश्र पीक ) यासारखी पिके कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार घेण्याचा सल्ला दिला आहे. १ ते १५ आॅगस्टपर्यंत एरंडी, तीळ, संकरित बाजरी, रागी, एरंडी अधिक धने मिश्र पिके घ्यावीत, १६ ते ३१ आॅगस्टपर्यंत अशीच पिके घ्यावीत तथापि कापूस, ज्वारी, भुईमूग ही पिके घेऊ नयेत, असेही सल्ला देताना म्हटले आहे. दरम्यान, असे सर्व असले तरी शेतकरी आताच गलितगात्र झाला असून, त्याच्याकडे पैसाच नसल्याने दुबार पेरणी करणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

 मूग, उडीद हातचा गेला!धान, मूग, उडिदाचे पीक हातचे गेल्यात जमा आहे. सोयाबीन तग धरू न होते; मात्र आता त्याचीही वाट लागली आहे. कापसाची वाढ खुंटली असून, ज्वारीचेही पीक करपले आहे.

- पाऊसच नसल्याने विदर्भातील २० ते २५ लाख हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे यावर्षी ४० टक्क्यांवर उत्पादन घटण्याची शक्यता आहे.डॉ. शरद निंबाळकर,माजी कुलगुरू ,डॉ. पंदेकृवि, अकोला.

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरी