शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

विदर्भ कोकण ग्रामीण बँक घोटाळा; एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 10:34 IST

आरोपीस ५ जून रोजी पातूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी ४ जून रोजी रात्री तिघांविरुद्ध चान्नी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकास अटक केली आहे. या आरोपीस ५ जून रोजी पातूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.विदर्भ कोकण ग्रामीण बँक चान्नी शाखेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी पीक कर्जाच्या रकमेची उचल न केलेल्या शेतकºयांच्या बँक खात्याचा गैरवापर करत त्यांच्या नावाने पीक कर्जाची उचल केली. तसेच शासनाला कोट्यवधी रुपयांनी चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी ३१ मे रोजी पत्रकार परिषदेत उघड केला होता.आमदार नितीन देशमुख यांनी बँकेकडे २८ एप्रिल २०२० रोजी तक्रार केली होती. तसेच विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील आर्थिक घोटाळ्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली असून, सीआयडीकडून चौकशी करण्याची मागणी केल्याचे देशमुख यांनी सांगितले होते. या प्रकरणातील दोन आरोपी पसार झाले असून, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.तत्कालीन अधिकाºयाविरुद्ध गुन्हा दाखलशाखा प्रबंधक संतोष कापडिया यांनी ३० रोजी चान्नी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सेवानिवृत्त शाखा अधिकारी कैलास बद्रीलाल अग्रवाल, तत्कालीन सहायक प्रबंधक कृष्णकांत मधुकर बोरकर, तसेच तत्कालीन सहायक प्रबंधक शैलेंद्र सुरेंद्र खोबरागडे यांच्याविरुद्ध ४ जून रोजीच्या रात्री भादंविच्या ४२०, ४०९, ४६५, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच कृष्णकांत मधुकर बोरकर याला छोटा बाजार येथून अटक केली.

टॅग्स :AkolaअकोलाbankबँकCrime Newsगुन्हेगारी