अकोल्यात विदर्भ केसरी स्व.ब्रजलाल बियाणी यांना आदरांजली

By Atul.jaiswal | Published: December 6, 2017 06:56 PM2017-12-06T18:56:20+5:302017-12-06T18:58:00+5:30

अकोला: जेष्ठ स्वातंत्र सेनानी,घटना समितीचे सदस्य व थोर विदर्भवादी स्व.ब्रजलाल बियाणी यांच्या १२१ व्या जयंती दिनी त्यांना शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था,संघटनांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. 

Vidarbha Kesari Brijlal Biyani birth aniversary celebrated in Akola | अकोल्यात विदर्भ केसरी स्व.ब्रजलाल बियाणी यांना आदरांजली

अकोल्यात विदर्भ केसरी स्व.ब्रजलाल बियाणी यांना आदरांजली

googlenewsNext
ठळक मुद्दे गांधी जवाहरलाल बाग येथील स्व.भाईजींच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर सोहळा

अकोला: जेष्ठ स्वातंत्र सेनानी,घटना समितीचे सदस्य व थोर विदर्भवादी स्व.ब्रजलाल बियाणी यांच्या १२१ व्या जयंती दिनी त्यांना शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था,संघटनांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. 
बुधवारी सकाळी  गांधी जवाहरलाल बाग येथील स्व.भाईजींच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर माहेश्वरी समाज ट्रस्ट, जिल्हा पत्रकार संघ, प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोहळ्यात माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष रमेश चांडक, नगरसेविका  उषा वीरक,बीजीई सोसायटीचे अध्यक्ष डॉ.आर.बी.हेडा, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिरसाहेब, प्रेस क्लब चे प्रा. सुभाष गदिया, विदर्भ चेंबर चे पुरुषोत्तम खटोड आदी मान्यवर उपस्थित होते.
स्व. भाईजींच्या प्रतिमेला हारार्पण व आदरांजलीने सोहळ्याचा प्रारंभ झाला. यावेळी डॉ.हेडा यांनी स्व. भाईजींच्या जीवनावर प्रकाश टाकला.ते म्हणाले महामानव हे राष्ट्राचे नेते असतात ,ते सर्व समाज व राष्ट्राला प्रगतीवर घेऊन जात असतात; मात्र आपण महामानवांना आपापल्या जातीत वाटून त्यांची उंची खुजी करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
यावेळी राजाभाऊ देशमुख, प्रभाकर पाटणकर,मोहनलाल नथ्थानी, शंकरलाल बियाणी, अ‍ॅड.एस.एस.ठाकूर, सुरेश मुंदडा, डॉ.अनिल तोष्णीवाल, रमेश बांगड, ओमप्रकाश चरखा, विनायक पांडे ,चौथमल सारडा, विनीत बियाणी, अरविंद सोनी, नारायण भाला, अजय तापडिया, अजय बियाणी, चंद्रकांत कुलकर्णी, वामनराव थोटांगे, हरीश मानधने, सुरेश काबरा, माजी भाजप महानगरध्यक्ष डॉ.अशोक ओळंबे,दीपक मायी,हरीशभाई अलिमचंदानी, आशिष पवित्रकार,नारायण घनगाव, कमलकिशोर शर्मा, नरेंद्र तापडिया, जयप्रकाश चांडक, नरेश बियाणी, केशव खटोड ,विजय रांदड, राधेशाम भंसाली,रमनभाई लाहोटी, प्रा.सत्यनारायण बाहेती, नरेंद्र भाला, राजेंद्र चितलांगे,सुरज काबरा, मनोज रांदड, शैलेश तोष्णीवाल, जय बांगड,संदेश रांदड, कमलकिशोर बियाणी, दीपक तोष्णीवाल,गोविंद सारडा,मनीष तिवारी,अरुण कोठारी, संजय चौधरी. प्रा.राम बाहेती, सागर लोहिया, अड.विशाल लढ्ढा,पियुष मालाणी,वासुदेव दहीकर,जे.एस.चौहान, गोविंद राठी, नंदकिशोर चांडक,बाबुराव देशमुख ,अतुल चौधरी,पंकज मणियार,सौ.अन्नपूर्णा राठी, सौ.वंदना हेडा,सौ.लीलादेवी जाजू, कु.राधिका लाहोटी,प्राजक्ता हेडा समवेत, माहेश्वरी समाज ट्रस्ट ,विदर्भ चेंबर,जिल्हा पत्रकार संघ,प्रेस क्लब,जेष्ठ नागरिक संघ,माहेश्वरी प्रगती मंडळ,माहेश्वरी नवयुवती मंडळ, वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठ ,माहेश्वरी प्रगती मंडळ, जिल्हा माहेश्वरी संघटन ,तहसील माहेश्वरी संघटन, माहेश्वरी युवा संघटन ग्रंथालय संघ, माहेश्वरी महासभा,दाल मिल असो.एमआयडीसी प्लॉट मालक संघ ,सेवाश्री, नारायण सेवा संस्थान ,इंटक ,भाजप अनु.जाती मोर्चा, फेसकाम ,सराफ असो. श्रीराम समूह, रामदेवबाबा समिती, रेडक्रॉस ,सालसार भजन मंडळ,सद्गुरू परिवार,उद्योग आघाडीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Web Title: Vidarbha Kesari Brijlal Biyani birth aniversary celebrated in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.