शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
3
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
4
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
5
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
6
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
7
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
8
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
9
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
10
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
11
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
12
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
13
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
14
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
15
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
16
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
17
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
18
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
19
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
20
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!

व-हाडात १३८ टक्के पाऊस पण, धरणातील जलसाठा अत्यल्पच!

By admin | Updated: July 19, 2016 00:33 IST

पावसाचे पावणे दोन महिने संपले; आता धरणे भरण्यासाठी हवा पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस

अकोला: पश्‍चिम विदर्भातील (वर्‍हाड) पाच जिल्हय़ांत यावर्षी १३८ टक्के पाऊस पडला आहे. पिकांना पोषक ठरणार्‍या या पावसामुळे शेतकरी आनंदीत आहेत; परंतु पावसाचे पावणे दोन महिने संपूनही धरणांच्या जलपातळीत पूरक वाढ झाली नाही. मागील दोन वर्षांपासून टंचाईचे चटके सहन करणार्‍या या भागातील जनतेला आता पिण्याच्या पाण्यासाठी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. जून-जुलै महिन्याच्या सरासरीनुसार पश्‍चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतममाळ व अमरावती या पाच जिल्हय़ांत ३00 मि.मी. पाऊस अपेक्षित होता; परंतु १८ जुलैपर्यंत यावर्षी ४१३ मि.मी. म्हणजेच १३८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या आकड्यात वाढ झालेली असली तरी धरणांच्या साठय़ात मात्र अपेक्षित वाढ झालेली नाही. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा विस्ताराने मोठे असलेल्या या धरणात आजमितीस केवळ १0.४३ दशलक्ष घनमीटर म्हणजेच १२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मोर्णा मध्यम प्रकल्पात ७.३१ दलघमी (१२.८१ टक्के), निगरुणा ४.६१ दलघमी (१२.९८ टक्के), उमा २.0८ दलघमी (१७.८१ टक्के), वाण ५४.0३ दलघमी (६५.९३ टक्के), पोपटखेड लपा 0.३२ दलघमी (५८.२९ टक्के) तर दगडपारवा या धरणात 0.२७ दलघमी म्हणजेच २.६८ टक्के जलसाठा आहे.बुलडाणा जिल्हय़ातील खडकपूर्णा धरण शून्य टक्के असून, नळगंगा धरणात ८.५४ दलघमी (१२.३२ टक्के), ज्ञानगंगा ८.५ दलघमी (२३.७३ टक्के), मस ७.५१ दलघमी (४९.४३ टक्के), कोराडी १.0८ दलघमी (७.१४ टक्के), पलढग 0.९१ दलघमी (१२.१२ टक्के), मन ११.४0 दलघमी (३0.९५ टक्के), पेनटाकळी ४.४५ दलघमी (७.४२)टक्के, तोरणा २.0१ दलघमी (२५.४८ टक्के), उतावळी १0.३५ दलघमी (३२.0९ टक्के) जलसाठा आजमितीस उपलब्ध आहे. वाशिम जिल्हय़ातील एकबुर्जी या मध्यम प्रकल्पात १५.२८, तर सोनल या प्रकल्पात 0१.४७ दलघमी जलसाठा संचयित झाला आहे.अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणातील जलसाठय़ात वाढ होण्यासाठी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाचे सव्वा दोन महिने शिल्लक असल्याने धरणात पूरक जलसाठा संचयित होईल, अशी सर्वांना आशा आहे.- विजय लोळे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, अकोला.