शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयाचे प्रवेश रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 8:36 PM

पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयाचे प्रवेश रखडले

अकोला : पश्चिम विदर्भातील शेतकºयांच्या पाल्यांना पशुवैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेता यावे म्हणून तीन वर्षांपूर्वी अकोल्याला शासकीय पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय मिळाले; पण जागेअभावी आतापर्यंत महाविद्यालय सुरू झाले नसल्याने पदवी अभ्यासक्र प्रवेशापासून या भागातील विद्यार्थी वंचित आहेत. पश्चिम विदर्भात शासकीय पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयच नसल्याने येथील विद्यार्थ्यांना नागपूर, मराठवाडा, पश्चिम महाराष्टÑ किंवा मुंबईला जावे लागते. इच्छा असूनही आर्थिक स्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जाता येत नाही. या पृष्ठभूमीवर शासनाने पश्चिम विदर्भात अकोला व खान्देशातील जळगाव या दोन ठिकाणी शासकीय पदवी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात परवानगी देऊन प्रत्येकी पाच कोटी रुपये निधी मंजूर केला होता; पण गत चार वर्षांपासून केवळ जागेअभावी हे महाविद्यालय सुरू होऊ शक ले नाही. गतवर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वाशिम रोडवरील जागा ठरविण्यात आली होती. आता पुन्हा यात फेरबदल करण्यात आला असून, बाभूळगाव जहागीर येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. महाराष्टÑ (माफसू) पशू, मत्स्य व विज्ञान विद्यापीठाला या जागेचा सातबारा मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. पश्चिम विदर्भातील अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून असल्याने त्यादृष्टीने गत चार वर्षांपूर्वी अर्थसंकल्पात हा विचार करू न अकोला येथे या महाविद्यालयास मंजुरी देण्यात आली आहे. (व्हीसीआय) व्हेटरनरी कौन्सिल आॅफ इंडियाच्या निकषानुसार, महाविद्यालयाला जागा हवी आहे. अकोल्यात माफसूचे स्नातकोत्तर पशुवैद्यक व विज्ञान संस्थेची जागा आहे, तेथे एमएससी ते पीएचडीपर्यंतचा अभ्यासक्रम शिकविला जातो. संसाधने, प्रयोगशाळा उपलब्ध आहे. कर्मचारी, शास्त्रज्ञ तसेच अधिकारी वर्गही आहे. केवळ दोन विभाग सुरू करावे लागतील, असे असताना केवळ जागा मिळत नाही, ही सबब पुढे करीत येथे पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून होत आहे. आता डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या जागेचा सातबारा मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. याची पुढील प्रक्रिया शासनाला परिपत्रकानंतर सुरू होईल.‘व्हीसीआय’च्या निकषानुसार जागा उपलब्ध झाली असून, सातबारा प्राप्त झाला आहे. शासनाचे परिपत्रक प्राप्त होताच पुढील कामाला सुरुवात होईल. ‘व्हीसीआय’च्या निकषाप्रमाणे स्नातकोत्तर संस्थेची जागा कमी असल्याने प्रवेश प्रक्रिया सुरू केली नाही.- डॉ. व्ही. डी. अहेर,सहयोगी अधिष्ठाता,स्नातकोत्तर पशुवैद्यक व विज्ञान संस्था, अकोला.
टॅग्स :Akolaअकोला