शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘नो पार्किंग’मधील चारचाकी वाहनांना लागणार ‘जॅमर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 12:47 IST

आता बेशिस्त चारचाकी वाहने उभी करणाऱ्यांच्या वाहनांना जॅमर लावण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशहरातील प्रमुख रस्त्यांवर जागा मिळेल अशा ठिकाणी चालक अस्ताव्यस्त वाहने पार्किंग करतात. वाहनांवर कारवाई करण्यासाठी आता पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेने शुक्रवारपासून कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. अकोलेकरांना वाहने सांभाळा आणि वाहतूक नियमांचे पालन करावे लागणार आहे.

अकोला: अकोलेकर वाहन चालकांच्या बेशिस्त वाहतुकीला पोलीस वाहतूक नियंत्रण शाखा शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत आहे. तरीही वाहन चालक वठणीवर येत नाहीत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर जागा मिळेल अशा ठिकाणी चालक अस्ताव्यस्त वाहने पार्किंग करतात. अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी आता पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेने शुक्रवारपासून कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. आता बेशिस्त चारचाकी वाहने उभी करणाऱ्यांच्या वाहनांना जॅमर लावण्यात येणार आहे.शहरातील रस्त्यांवर केलेले अतिक्रमण, त्यात बेशिस्त वाहतूक, मिळेल त्या जागेवर अस्ताव्यस्त पद्धतीने वाहन, दुचाकी उभी करण्याची बेकिरी, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील रस्त्यांवर अनेकजण वाट्टेल त्या ठिकाणी कार पार्किंग करतात. आॅटोरिक्षा चालक तर रस्त्यावर कुठेही अचानक थांबतात आणि रिक्षा उभी करतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. मेट्रो शहरांमध्ये चालकाने नो पार्किंगमध्ये वाहन उभे केल्यास, त्याचे वाहन उचलून नेल्या जाते; परंतु अकोला शहरात तशी सुविधा आतापर्यंत उपलब्ध झाली नव्हती. अखेर पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी शहराची गरज आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता, जॅमर लावण्याचा निर्णय घेतला. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनीही वाहतूक नियंत्रण शाखेला जॅमर उपलब्ध करून दिले. सद्यस्थितीत पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेला सहा जॅमर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शुक्रवारपासून शहरातील काही रस्त्यांवर जॅमर लावण्याची मोहीम वाहतूक पोलिसांनी राबविली. शहरातील रस्त्यावर पिवळ्या पट्ट्यांच्या बाहेर किंवा नो पार्किंग झोनमध्ये उभ्या चारचाकी वाहनांना पोलिसांनी जॅमर लावले होते. त्यामुळे अनेक कार चालकांची गोची झाली होती. आता ही मोहीम दररोज राबविण्यात येणार आहे. त्यामुळे अकोलेकरांना वाहने सांभाळा आणि वाहतूक नियमांचे पालन करावे लागणार आहे.१८ चारचाकी वाहनांवर कारवाईशुक्रवारी रस्त्यांवरील पिवळ्या पट्ट्यांच्या बाहेर आणि नो पार्किंग झोनमध्ये उभ्या असलेल्या १८ चारचाकी वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करीत चाकांना जॅमर लावले. त्यामुळे कार चालकांचे चांगलेच वांधे झाले होते. अखेर पोलिसांकडे ३६०० रुपये दंड भरून जॅमर काढण्याची वेळ चालकांवर आली होती.

रस्त्यांवरील पिवळ्या पट्ट्यांच्या बाहेर आणि नो पार्किंग झोनमध्ये चारचाकी वाहने उभे करणाऱ्या चालकांवर शुक्रवारी कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. वाहतूक नियंत्रण शाखेला सहा जॅमर उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आता चारचाकी, दुचाकी वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे.-विलास पाटील, पोलीस निरीक्षकवाहतूक नियंत्रण शाखा.

 

टॅग्स :Akolaअकोलाtraffic policeवाहतूक पोलीस