शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वीस दिवसांपासून नाफेड केंद्रावर अडीचशे शेतकऱ्यांची वाहने उभी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 10:24 IST

शासनाच्या नाफेडमार्फत शेतकऱ्यांच्या हरभरा खरेदीची प्रक्रिया तेल्हारा खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून सुरू केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : शासनाच्या नाफेडमार्फत शेतकऱ्यांच्या हरभरा खरेदीची प्रक्रिया तेल्हारा खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून सुरू केली होती. शेतकºयांना विक्री केंद्रावर माल घेऊन येण्यासाठी संदेशही पाठविण्यात आले; परंतु संस्थाचालकांच्या अंतर्गत वादामुळे ही खरेदी बंद पडली. गत २0 दिवसांपासून अडीचशे शेतकºयांचा हजारो क्विंटल हरभरा वाहनांमध्ये पडून आहे. पावसामुळे हरभरा भिजला असून, शेतकºयांच्या मालाचे नुकसान होत आहे. शेतकरी मोजणीच्या प्रतीक्षेत आहेत.शेतकºयांच्या शेतमाला भाव मिळावा, यासाठी शासनाने नाफेडचे खरेदी केंद्र सुरू केले. तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नाफेडने खरेदी-विक्री सहकारी संस्थेला सब एजंट नियुक्त केले. शेतकºयांनी नाफेड केंद्रावर हरभरा, तूर विक्रीसाठी आणावी, यासाठी खरेदी-विक्री संघाने नोंदणी केलेल्या शेतकºयांना मोबाइलद्वारे संदेश पाठविले खरे. त्यानुसार शेकडो शेतकरी केंद्रावर भाड्याच्या वाहनाने, ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे शेतमाल घेऊन मोजणीसाठी हजर झाले; परंतु खरेदी-विक्री संघाच्या संचालकांमध्ये अंतर्गत वादामुळे २0 दिवसांपासून खरेदी बंद पडली. त्यानंतर पुन्हा खरेदी सुरू करण्यात आली. १५ जुलै ही खरेदीची अंतिम तारीख असल्याने ५, १३ व १४ जुलै रोजी शेतकºयांना संदेश पाठविण्यात आले. त्यानुसार शेतकरी ६ जुलैपासून हरभरा घेऊन नाफेड केंद्रावर हजर झाले. हरभºयाची मोजणी संथगतीने सुरू असल्यामुळे अनेक शेतकरी हरभºयाचे मोजमाप होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. १४ व १५ जुलै रोजी जोरदार पाऊस पडला. तेव्हापासून हरभरा खरेदी ही बंद पडली आहे. हरभरा मोजणी सुरू होईल, याची प्रतीक्षा असल्याने, शेकडो शेतकºयांच्या हरभºयासह भाड्याच्या वाहनांमध्ये ट्रॅक्टर-ट्रॉली उभ्या आहेत. पावसामुळे अनेक शेतकºयांचा हरभरा भिजला असून, शेतकºयांचे नुकसान होत आहे. आधीच निसर्गाच लहरीपणा, बोगस बियाण्यांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात नाफेडच्या अंतर्गत राजकारणामुळे शेतकरी भरडला जात आहे.

खरेदीसाठी भाजपचे आंदोलनभाजप पदाधिकाºयांनी खरेदी-विक्री संघाला भेट देऊन वरिष्ठ अधिकाºयांना खरेदीबाबत तोडगा काढून माल खरेदी करण्याचे निर्देश दिले आणि खरेदी-विक्री संघाच्या उपाध्यक्षांसोबत चर्चा करीत, अंतर्गत वाद बाजूला ठेवून रखडलेली खरेदी सुरू करण्यास बजावले.

जेसीबीने काढताहेत ट्रॅक्टरबाजार समितीच्या आवारात पावसामुळे चिखल साचला असून, या चिखलात शेतकºयांचे ट्रॅक्टर फसले आहेत. हे ट्रॅक्टर-ट्रॉली जेसीबीद्वारे काढण्यात येत आहेत. ट्रॅक्टरमधील हरभरा सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू केले आहे.

हरभºयाला फुटले कोंब!नाफेड अंतर्गत मोजणी सुरू होईल, या आशेवर शेतकरी आहेत. त्यामुळे शेकडो मालवाहू वाहने, ट्रॅक्टर घेऊन मालासह नाफेड केंद्रावर २0 दिवसांपासून हरभरा मोजणीची प्रतीक्षा करीत आहेत. दरम्यान, आलेल्या पावसामुळे वाहने, ट्रॅक्टरमधील हरभरा भिजल्यामुळे हरभºयाला कोंब फुटले आहेत. शेतकºयांचे नुकसान झाल्यानंतर खरेदी-विक्री संघ हरभरा खरेदी करणार का, असा संतप्त सवाल शेतकºयांनी केला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराFarmerशेतकरी