शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक कारणामुळे वसंत देसाई तरणतलाव पुन्हा बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 15:43 IST

शहरात एकमेव असलेला तरणतलाव परत दोन दिवसांसाठी तांत्रिक कारणामुळे बंद करण्यात आला आहे.

अकोला: पाच-सहा महिने दुरुस्तीच्या नावाखाली बंद असलेला तरणतलाव अर्ध्यावर उन्हाळा आल्यानंतर सुरू करण्यात आला होता; मात्र एक महिनाही उलटायच्या आत शहरात एकमेव असलेला तरणतलाव परत दोन दिवसांसाठी तांत्रिक कारणामुळे बंद करण्यात आला आहे.२१ व २२ मे रोजी तांत्रिक कारणामुळे तरणतलाव बंद करण्यात आला असल्यामुळे जलतरणपटूंमध्ये नाराजी पसरली. पहिलेच उन्हाळ्याचा अर्धा मोसम संपल्यानंतर तरणतलाव सुरू करण्यात आला. त्यात प्रत्येक शासकीय सुटीच्या दिवशी तलाव बंद करण्यात येतो. तसेच दर रविवारी तरणतलाव बंद असतो. उन्हाळ्याच्या दिवसातच तलाव बंद करण्यात येतो तर शुल्क भरू नही फायदा काय, अशी संतप्त प्रतिक्रिया सोमवारी लोकमतजवळ जलतरणपटूंनी व्यक्त केली.यासंदर्भात प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांच्याशी संवाद साधला असता, तरणतलावाच्या पाण्यात क्लोरिनचे प्रमाण जास्त झाले आहे. एका स्विमरला यामुळे त्रास झाला. यामुळे इतरही स्विमर्सला काही अपाय होऊ नये. विनाकारण कोणाला त्रास होऊ नये, यासाठी तातडीने पाणी बदलविण्याचे काम सुरू केले. क्लोरिनचा एक उचित प्रवाह प्रमाण राखणे आवश्यक असते. तसेच सक्शन मशीन खराब झाली आहे. मशीनची दुरुस्ती करू न पाणी स्वच्छ करण्यात येणार असल्याचेदेखील कुळकर्णी यांनी सांगितले.पालकांना तलाव परिसरात प्रवेशपालकांना तरणतलाव परिसरात थांबण्याची सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी बंदी घातली होती. आता मात्र ही बंदी उठविण्यात आली असून, केवळ महिलांच्या बॅचच्या वेळी गॅलरी बंद ठेवण्यात येते, असेदेखील कुळकर्णी यांनी सांगितले.

 

 ‘‘मशीन दुरुस्तीसाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. हा दोन दिवसांचा कलावधी सर्व स्विमर्सला वाढवून देण्यात येणार आहे.’’गणेश कुळकर्णीप्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी

 

टॅग्स :AkolaअकोलाVasant Desai Stadiumवसंत देसाई क्रीडांगणSwimmingपोहणे