शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडातील जलसाठा पोहोचला ५८ टक्क्यांवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 13:04 IST

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यातील धरणातील साठा आजमितीस ५०.०२ टक्केपर्यंत पोहोचला; पण बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा हे मोठे धरण कोरडेच असून, इतरही धरणात अल्प जलसाठा असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अकोला जिल्ह्याची जीवनरेखा काटेपूर्णा धरणाचा जलसाठा मात्र ८० टक्क्यांवर पोहोचल्याने अकोलेकरांसह शेतकºयांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, ...

ठळक मुद्देअकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत.या सर्व धरणात २४ आॅगस्ट रोजी ५८.०२ टक्के जलसाठा सध्या उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणांमधील जलसाठा शून्य टक्केच आहे.

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यातील धरणातील साठा आजमितीस ५०.०२ टक्केपर्यंत पोहोचला; पण बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा हे मोठे धरण कोरडेच असून, इतरही धरणात अल्प जलसाठा असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अकोला जिल्ह्याची जीवनरेखा काटेपूर्णा धरणाचा जलसाठा मात्र ८० टक्क्यांवर पोहोचल्याने अकोलेकरांसह शेतकºयांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणात २४ आॅगस्ट रोजी ५८.०२ टक्के जलसाठा सध्या उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणांमधील जलसाठा शून्य टक्केच आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ८० टक्के जलसाठा संकलित झाला आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ९५.५३ टक्के जलसाठा संकलित झाला असून, उमा १००, मोर्णा धरणात ४५.३७ टक्के, तर वान धरणात आतापर्यंत ८७.०४ टक्के जलसाठा संकलित झाल्याने या धरणाचे दोन वक्रव्दारातून शुक्रवारी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणात अद्याप एक थेंबही वाढ झाली नसल्याने या धरणाची पातळी शून्य टक्के आहे. याच जिल्ह्यातील कोराडी मध्यम धरणातील जलसाठा ६.२८ टक्के आहे. तोरणा १४.०७, तर उतावळी धरणातील पातळी ३०.२२ टक्के झाली आहे. याच जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १६.८६ टक्के, पेनटाकळी धरणात १३.८२ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १९.३६ टक्के, पलढगमध्ये २३.८३ टक्के, मन धरणात २२.०५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ८७.३३ टक्के, एकबुर्जी व सोनल धरणात १०० टक्के जलसाठा आहे.अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा धरणात ४६.८८ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये १००, अरुणावती ९८.९७, तर बेंबळा धरणात ५९.७६ टक्केच जलसाठा आहे.- पश्चिम वºहाडातील अकोला जिल्ह्यातील धरणात यावर्षी बºयापैकी जलसाठा संचयित झाला असून, यावर्षी शेतकºयांना रब्बी व उन्हाळी पिकांना सिंचनासाठी पाणी देण्यात येईल. त्यासाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ठरल्यानंतर निर्णय घेण्यात येईल.अंकुर देसाई,अधीक्षक अभियंता,पाटबंधारे मंडळ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण