काटेपूर्णा धरणात ५५ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 02:41 PM2018-08-21T14:41:48+5:302018-08-21T14:43:40+5:30

अकोला : काटेपूर्णा धरणातील जलसाठा ५५ टक्क्यांवर पोहोचला असून, पाण्याचे नियोजन केल्यास दोन वर्षांची सोय झाली आहे. यावर्षी सिंचनासाठी पाणी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

55% water storage in Kateparata dam | काटेपूर्णा धरणात ५५ टक्के जलसाठा

काटेपूर्णा धरणात ५५ टक्के जलसाठा

Next
ठळक मुद्देजलग्रहण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने आजमितीस या धरणाचा जलसाठा (४६.५९ दशलक्ष घनमीटर) ५५ टक्क्यांवर पोहोचला आहे. दोन वर्ष पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याचे समाधान अकोलेकरांच्या चेहऱ्यावर असून, एकदाचे पाणी संकट टळल्याने सुटकेचा नि:श्वास टाक ला आहे.

अकोला : काटेपूर्णा धरणातील जलसाठा ५५ टक्क्यांवर पोहोचला असून, पाण्याचे नियोजन केल्यास दोन वर्षांची सोय झाली आहे. यावर्षी सिंचनासाठी पाणी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मागच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने काटेपूर्णा धरणात अल्प जलसाठा असल्याने यावर्षीच्या उन्हाळ््यात अकोलकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. अकोला शहर वगळता या धरणातून पाणी पुरवठा बंद केल्याने या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेली गावे, औद्योगिक वसाहतीला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. यावर्षीही सुरुवातीला पाऊस लांबल्याने अकोलेकरांची चिंता वाढली होती. पण, जुलै आणि आॅगस्टमध्ये या धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने आजमितीस या धरणाचा जलसाठा (४६.५९ दशलक्ष घनमीटर) ५५ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागच्यावर्षी २१ टक्के असलेला जलसाठा दुपटीने वाढल्याने आता दोन वर्ष पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याचे समाधान अकोलेकरांच्या चेहऱ्यावर असून, एकदाचे पाणी संकट टळल्याने सुटकेचा नि:श्वास टाक ला आहे. पातूर तालुक्यातील मोर्णा धरणात १४.०४ दलघमी म्हणजेच ५७.३८ टक्के, तर निर्गुणा धरणात १८.८० दलघमी म्हणजेच ६५.१६ टक्के जलसाठा संचयित झाला आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरण यावर्षीच्या उन्हाळ््यात शून्य टक्क्यावर आले होते.
या धरणात आजमितीस ९.२४ दलघमी म्हणजेच ७९.११ टक्के साठा उपलब्ध झाला आहे. घुगंशी बॅरेज मात्र शून्य टक्क्यावर आहे. अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या ५६.१५ दलघमी म्हणजेच ६८.५२ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.

सिंचनाची होणार सोय!
गत तीन-चार वर्षांपासून सिंचनासाठी शेतकºयांना पाणी मिळणे कठीण झाले होते. मागच्या वर्षीच्या रब्बी व यावर्षीच्या उन्हाळी पिकांना शेतकºयांना पाणी मिळाले नाही, पण यावर्षी धरणात ५० टक्केच्यावर पाणी पोहोचल्याने सिंचनासाठीच्या पाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अकोलेकरांना मिळणार दरडोई १४० लीटर पाणी
सतत पाणीटंचाईचा सामना करणाºया अकोलकरांना यावर्षी दरडोई १४० लीटर पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पावसाळ््याचे आणखी पावणे दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे यावर्षी धरणाचा जलसाठा शंभर टक्केपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या दरडोई १०० लीटर पाणी पुरवठा केला जातो. आता १४० लीटर दरडोई पाणी मिळणार असल्याचे वृत्त आहे.

 

 

Web Title: 55% water storage in Kateparata dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.