शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या पाणीपट्टी देयकांची वंचित बहुजन आघाडीने केली होळी

By नितिन गव्हाळे | Updated: March 24, 2024 21:18 IST

मनमानी पद्धतीने देयके देऊन फसवणूक केल्याचा आरोप

अकोला: वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रविवारी सायंकाळी सिव्हिल लाइन चौकात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद अध्यक्ष संगिता अढाऊ यांच्या हस्ते शहरातील नागरिकांना दिल्या गेलेल्या अवाजवी पाणीपट्टी बिलांची होळी करण्यात आली. ३० हजार पाणीपट्टी देयकांची होळी करून मनपा प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा वंचित बहुजन आघाडीने घोषणाबाजी करून निषेध केला. भ्रष्टाचार आणि फसवणूक करून मनपाने नागरिकांना ३० हजार पाणीपट्टी देयकश दिल्याचा आरोप वंचितने केला आहे.

महानगरपालिकेने शहरातील नागरिकांच्या घरगुती नळ कनेक्शनवर मीटर बसविले. या मीटरचे रीडिंग घेऊन नागरिकांना वेळेवर देयके देण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची होती. परंतु संबंधित कंत्राटदारांकडून कुठे वर्षभर तर कुठे ६ महिने रीडिंग घेतल्या गेले नाही तर काही भागात रीडिंगच घेतल्या गेले नसल्याचाही आरोप वंचित बहुजन आघाडीने करीत, काही ठिकाणी तर अवैध नळ कनेक्शन देण्यात आले असून मनमानी पद्धतीने नागरिकांना पाणीपट्टीची देयके देण्यात आल्याचे वंचितने निवेदनात म्हटले आहे.

या होळी दहन आंदोलनात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा.अंजली आंबेडकर, पार्लामेंट्री बोर्ड सदस्य अशोक सोनोने, प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, महीला आघाडी प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महीला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, पुर्व महानगर अध्यक्ष शंकरराव इंगळे,पश्चिम कार्याध्यक्ष मजहर खान, महीला आघाडी महानगर अध्यक्ष वंदना वासनिक, शहर संघटक निलेश देव, गजानन गवई, जि.प. सभापती आम्रपालीताई खंडारे, ॲड. संतोष रहाटे, मनोहर बनसोड, सचिन शिराळे, डाॅ. मेश्राम, अशोक शिरसाट, सुरेश शिरसाट, आकाश गवई, किशोर मानवटकर,राजु बोदडे, रितेश यादव, वैभव खडसे, नागेश उमाळे, आकाश जंजाळ, सुनिल शिराळे, आशिष सोनोने, शंकर इंगोले, सुवर्णा जाधव, संगीता खंडारे, नितेश किर्तक, ॲड. आकाश भगत,चिकु वानखडे, रंजीत वाघ, राजेश मोरे, नितीन सपकाळ, सुनिल पाटील, आदी उपस्थित होते.नळ जोडण्या तोडल्याचा आरोपशहरात काही ठिकाणी मनमानी पद्धतीने देण्यात आलेली देयके नागरिकांनी भरली नाहीत म्हणून त्यांच्या नळ जोडण्या तोडून पाणीपुरवठा खंडित केला गेला. याबाबत महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडी नगरसेवकांनी अनेक सभांमध्ये अनेक तक्रारी केल्या. अनेक वेळा निवेदने दिली. चुकीची पाणीपट्टी कर आकारणी थांबवून योग्य पद्धतीने कर आकारणी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाHoliहोळी 2024