शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सर्व जागांवर लढण्याची ‘वंचित’ची तयारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 12:37 IST

वंचितने मात्र राज्यातील सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्दे वंचितने २८८ जागांसाठी उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. विदर्भातील मतदारसंघाकरिता उमेदवारांच्या मुलाखतीची सुरुवात शुक्रवारपासून होत आहे.या पक्षाकडे उमेदवारांची किती गर्दी होते, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष आहे.

अकोला: लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या लक्षणीय मतांमुळे तब्बल १५ मतदारसंघांतील निकाल फिरले आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी वंचितला सोबत घेण्यासाठी काँग्रेस आघाडीकडून प्रयत्न सुरू असतानाच वंचितने मात्र राज्यातील सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. उमेदवादी निश्चितीसाठी पार्लमेंटरी कमिटी स्थापन करण्यात आली असून, शुक्रवारपासून विदर्भातील मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रमही हाती घेतला आहे.अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात औरंगाबाद वगळता त्यांना यश मिळाले नसले तरी राज्यातील १५ लोकसभा मतदारसंघांत ‘वंचित’ने घेतलेल्या मतांमुळे काँग्रेस आघाडीच्या विजयाचे गणित बिघडले. यामध्ये अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे व माणिकराव ठाकरे यांच्यासारख्या दिग्गजांना पराभवाचा झटका बसला. या पराभवापासून धडा घेत काँग्रेसने ‘वंचित’सोबत आघाडी करण्याकरिता पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात अजूनपावेतो अधिकृत बैठक किंवा जागांच्या प्रस्तावाबाबत चर्चा झालेली नसल्याने ही संभाव्य आघाडी केवळ माध्यमांमधील चर्चेतच आहे. या पृष्ठभूमीवर वंचितने २८८ जागांसाठी उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. विदर्भातील मतदारसंघाकरिता उमेदवारांच्या मुलाखतीची सुरुवात शुक्रवारपासून होत आहे. १३ जुलै रोजी नागपूर, १४ रोजी अमरावती तर १५ रोजी पश्चिम वºहाडातील उमेदवारांसाठी अकोल्यात मुलाखती होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत वंचितने घेतलेल्या मतांमुळे या पक्षाकडे उमेदवारांची किती गर्दी होते, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष आहे. विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या चाचपणीसाठी पार्लमेंटरी कमिटी स्थापन करण्यात आली असून, अण्णाराव पाटील, अशोक सोनोने व रेखा ठाकूर यांचा या कमिटीमध्ये समावेश आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांवर वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान प्रबळ दावेदारांचा शोध घेतला जाईल. त्यानंतर सर्व उमेदवारांचा अहवाल अ‍ॅड. बाळासाहेबांना सादर केला जाईल.-अशोक सोनोने, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भारिप बहुजन महासंघ.

 

टॅग्स :AkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPoliticsराजकारण