शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखण्याचे ‘वंचित’समोर आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 12:31 IST

येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखण्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीसमोर राहणार आहे.

- संतोष येलकरअकोला: अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्य मिळवित भाजपाने विजय प्राप्त केल्यानंतर अकोला जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील पंचायत समित्या ताब्यात घेण्याचे ‘टार्गेट’ भाजपाने समोर ठेवले आहे. त्यानुषंगाने येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखण्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीसमोर राहणार आहे.गेल्या २५ वर्षांपासून अकोला जिल्हा परिषदेत भारिप बहुजन महासंघाची सत्ता आहे, तसेच सध्या जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, पातूर व बाळापूर या चार पंचायत समित्यांमध्येही भारिप-बमसंची सत्ता आहे. अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी जाहीर झाला. लोकसभा निवडणुकीत ५ लाख ५४ हजार ४४४ मते प्राप्त करून भाजपाचे अ‍ॅड. संजय धोत्रे विजयी झाले, तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी २ लाख ७८ हजार ८४८ मते प्राप्त करीत ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्य घेत विजय मिळविल्यानंतर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपाने आता अकोला जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील पंचायत समित्या ताब्यात घेण्याचे ‘टार्गेट’ समोर ठेवले आहे. या पृष्ठभूमीवर येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधील सत्ता कायम राखण्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीसमोर राहणार असल्याचे वास्तव आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी भाजपाने जसे नियोजन केले होते, तसेच नियोजन जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत राहणार आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर लोकसभा जिंकली. आता जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांवरही भाजपाचा झेंडा फडकणार आहे. जिल्हा परिषदेच्या ३५ पेक्षा अधिक जागा जिंकून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचे आमचे ‘टार्गेट’ आहे.-तेजराव थोरात,जिल्हाध्यक्ष भाजपा.गेल्या २५ वर्षांपासून जिल्हा परिषदेत भारिप-बमसंची सत्ता आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचला असून, विकास कामे करण्यात आली. जिल्ह्यातील वंचित घटकांना सत्तेत बसविले. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता कायम राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या ४० जागा प्राप्त करण्याचे आमचे लक्ष्य आहे.-प्रदीप वानखडे,जिल्हाध्यक्ष, भारिप-बमसं.

 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदPoliticsराजकारण