- सत्यशील सावरकरतेल्हारा : सातपुडा पर्वत रांगांमध्ये असलेल्या वनौषधीनि व्यापलेल्या द-याखो-यातून निर्मळ वाहणारी वान नदी जलकुंभी सारख्या वनस्पतींच्या विस्ताराने दुषित होत आहे. वेळीच दखल घेतली नाही तर जलकुंभी संपूर्ण नदीपात्रात व्यापली जाईल. विदर्भातील नामवंत वारी हनुमान हे पर्यटन व तीर्थक्षेत्र स्थळ अकोला, बुलढाणा, अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील ठिकाण येथे भाविक श्रद्धेने श्री हनुमानाचे दर्शनासाठी येतात त्याच बरोबर या ठिकाणच्या नैसर्गिक सौंदर्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. विविध वनऔषधीच्या सातपुडा पर्वत रांगामधून वान नदी वाहते. वान नदी सारख्या खडकाळ नदीत जलकुंभी वाढणे व संपूर्ण पात्र व्यापणे धोकादायक आहे. वान नदी व त्यावरील हनुमान सागर धरण यामुळे दुरदुरचे पर्यटक येथे आवर्जून येतात वेळीच दखल न घेतल्यास याचा परिणाम पर्यटनावर व खरबूज टरबूज शेतीवर होवू शकतो. वान नदी पात्र वारी येथून पुढे रूंद आहे वारखेड, सोगोडा, दानापूर, काटोल कोलद, काकनवाडा, वानखेड, दुर्गादैत, पातुर्डा पुढे संगम भागापर्यंत या नदी पात्रात परंपरागत पद्धतीने शेतकरी टरबूज, खरबूज, काकडी सारखे पिके घेतात या नदी काठावरील जमीन सुपीक आहे. पात्रात जलकुंभी वाढ होत गेल्यास याचे परिणाम शेती व्यवसायावर सुद्धा होणार आहेत. त्यामुळे वेळीच दखल घेऊन अकोला स्वच्छ मोर्णा प्रमाणे अभियान राबविण्याची गरज आहे.
वान नदीला जलकुंभी चा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 14:10 IST
तेल्हारा : सातपुडा पर्वत रांगांमध्ये असलेल्या वनौषधीनि व्यापलेल्या द-याखो-यातून निर्मळ वाहणारी वान नदी जलकुंभी सारख्या वनस्पतींच्या विस्ताराने दुषित होत आहे.
वान नदीला जलकुंभी चा वेढा
ठळक मुद्देवेळीच दखल घेतली नाही तर जलकुंभी संपूर्ण नदीपात्रात व्यापली जाईल. अकोला स्वच्छ मोर्णा प्रमाणे अभियान राबविण्याची गरज आहे.