शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

६७ हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 13:30 IST

६७ हजार ६५९ शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे.

अकोला : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी शुक्रवार, १३ मार्चपर्यंत जिल्ह्यात ६७ हजार ६५९ शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे.शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख १२ हजार ३७९ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले असून, त्यापैकी बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात आलेल्या १ लाख ११ हजार ७९ शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. त्यापैकी २९ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यातील ८६ हजार ६२३ शेतकºयांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रसिद्ध करण्यात याद्यानुसार शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू आहे. त्यामध्ये १३ मार्चपर्यंत जिल्ह्यातील ६७ हजार ६५९ शेतकºयांचे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व कर्जखात्यातील रक्कम इत्यादींचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे. असे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. प्रवीण लोखंडे यांनी सांगितले.१८ हजार कर्जखात्यांचे प्रमाणीकरण प्रलंबित!जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांपैकी ८६ हजार ६२३ शेतकºयांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यापैकी १३ मार्चपर्यंत जिल्ह्यातील ६७ हजार ६५९ शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्यात आले असून, उर्वरित १८ हजार ९५७ शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित आहे.२४ हजार शेतकºयांच्या कर्जखात्यात १८८ कोटी!महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत १३ मार्चपर्यंत जिल्ह्यातील २४ हजार ९२८ शेतकºयांच्या कर्जखात्यात १८८ कोटी १३ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. प्रवीण लोखंडे यांनी दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी