मूर्तिजापूर : शहरात ऑटोरिक्षा वाहनांची संख्या वाढली असून, ऑटोचालक पेट्रोल व डिझेलऐवजी सर्रास रॉकेल वापरत आहेत. यामुळे वायूप्रदूषणात वाढ झाली आहे. रस्त्याने चालताना लहान मुले व महिलांनासुद्धा याचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांची नियमित तपासणी होत नसल्यामुळे असे प्रकार वाढत असल्याचे दिसत आहे. मूर्तिजापूर शहरात शिवाजी चौक, आंबेडकर चौक येथे नेहमी वर्दळ असते. अशातच रॉकेलमिश्रित ऑटो गर्दीतून जात असल्याने चालणार्यांना त्रास होत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे लहान मुले, वृद्ध व महिलांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. ऑटोरिक्षामधील रॉकेलची तपासणी करण्याचे अधिकार प्रादेशिक परिवहन अधिकारी व पोलिसांना आहेत; मात्र दोन विभाग याबाबत अनभिज्ञ का, असा सवाल त्रस्त जनता विचारत आहे. ट्रॅक्टर, ट्रक व काळीपिवळी टॅक्सीमध्ये ९० टक्के वाहनधारक डिझेल टाकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. या प्रकारामुळे रॉकेलचा काळाबाजार वाढला आहे.
ऑटोरिक्षामध्ये रॉकेलचा वापर
By admin | Updated: June 13, 2014 19:02 IST