शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

विदर्भात बनावट कीटकनाशकांचा वापर वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 14:43 IST

अकोला : कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर पिके जळाल्याच्या घटना विदर्भात समोर येत असून, अकोला जिल्ह्यात कपाशीचे पीक जळाल्याने बोगस कीटकनाशकांचा वापर होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.

ठळक मुद्देशासनाने ठरवून दिलेल्या यादींच्या व्यतिरिक्त कीटकनाशकांची विक्री होत असल्याने हे प्रकार घडत असल्याचे वृत्त आहे.कीटकनाशकांची फवारणी करताना जीवितहानी होऊ नये, यासाठीची जनजागृती करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले होते.

अकोला : कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर पिके जळाल्याच्या घटना विदर्भात समोर येत असून, अकोला जिल्ह्यात कपाशीचे पीक जळाल्याने बोगस कीटकनाशकांचा वापर होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान, शासनाने ठरवून दिलेल्या यादींच्या व्यतिरिक्त कीटकनाशकांची विक्री होत असल्याने हे प्रकार घडत असल्याचे वृत्त आहे.मागील वर्षी खरीप हंगामात कीटकनाशकांची हाताळणी करताना शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याच्या घटना विदर्भात घडल्याने शासनाने याची गंभीर दखल घेत कीटकनाशकांची फवारणी करताना जीवितहानी होऊ नये, यासाठीची जनजागृती करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले होते. कृषी विभागाने याबाबत जनजागृती मोहीम राबविली. यावर्षी मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. पावसाची अनिश्चितता, वातावरणातील बदलामुळे यावर्षीही कपाशीवर बोंडअळी, रसशोषण करणाºया किडीने आक्रमण केले. सोयाबीनवर स्पोडोप्टेरा, चक्रीभूंगा आदी किडींनी हल्ला केला. या किडीचे व्यवस्थापन करण्यासाठी शेकडो शेतकरी कृषी केंद्रांमधून विविध प्रकारची कीटकनाशके खरेदी करीत आहेत.शासनाने यावर्षी जिल्हानिहाय नोंदणीकृत व शिफारस केलेल्या कीटकनाशकांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्याचे धोरण जाहीर केले. या धोरणानुसारच कीटकनाशकांची यादी राज्याच्या कृषी आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठविली. असे असताना यादीबाहेरील कीटकनाशके येतात कशी, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.- गावातीलच साडेतीन एकर शेत ठोक्याने केले. कपाशीची लागवड करून भरघोस उत्पन्न घेण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने पीकही जोमदार आले; परंतु कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर साडेतीन एकरातील कपाशी करपली.रूपेश लासुरकार,शेतकरी,अकोली रू पराव, जिल्हा अकोला.- कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द!दरम्यान, चुकीची औषधे आदींसंदर्भात विभागीयगुण नियंत्रणविभागाने चौकशी करू न कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील १४ केंद्रांचा समावेश असून, वाशिम जिल्ह्यातील पाच केंद्र यामध्ये आहेत. अकोला जिल्ह्यातील ५६ कृषी सेवा केंद्रे या यादीत असून, एका केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला आहे.- कापूस जळाल्याने शेतकºयांनी तातडीने पंचायत समिती कृषी अधिकाºयांकडे तक्रारी कराव्यात, जिल्ह्यातील आपातापा येथील पिकाचे तणनाशक फवारल्यानंतर नुकसान झाले. या शेताची तज्ज्ञांकरवी पाहणी केली आहे. लवकरच अहवाल येईल.नरेंद्र शास्त्री,कृषी अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती